Onion  Agrowon
ताज्या बातम्या

Onion Market : सोलापुरात कांदा लिलाव सुमारे दोन तास रखडले

हमाल-तोलार आणि बाजार समिती प्रशासनात वाद

Team Agrowon

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या कांद्याचे वजन पहाटे करायचे की सकाळी या मुद्द्यावरून बाजार समिती प्रशासन आणि हमाल-तोलार कामगारांमध्ये सोमवारी (ता.१२) चांगलीच वादावादी झाली. त्यामुळे कांद्याचे लिलाव सुमारे दोन तास रखडले. निर्णयासाठी कामगार आडून बसल्याने शेवटी बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावर बैठक घेऊन चर्चेने तोडगा काढू, असा निर्णय घेतल्याने विषय निवळला आणि कांद्याचे लिलाव सुरु झाले.

बाजार समितीत दिवस आणि रात्रभर सातत्याने कांदा बाजारात येतो. पण रोज सकाळी दहाच्या सुमारास कांद्याचे लिलाव होतात. कांदा आल्यानंतर त्या-त्या अडतीकडील कांद्याचे पहाटेपासूनच तोलार वजन करतात. परंतु प्रत्यक्षात जेव्हा लिलाव होऊन व्यापारी कांदा उचलतात, तेव्हा त्यात मोठी तूट येते किंवा कांद्याची वजन कमी झाल्याचे दिसून येते. अर्थात, कांद्याची चोरी होते, हे उघड होत आहे. त्यामुळे कांद्याच्या लिलावाअगोदर सकाळी आठच्या सुमारास कांद्याचे वजन करावे, असा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला, पण आम्हाला विश्वासात न घेता, हा निर्णय घेतल्याने हमाल-तोलार कामगार संतप्त झाले आणि त्यांनी लिलाव रोखून धरले. बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे यांनी कामगारांशी संवाद साधला, पण ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेवटी सभापती, आमदार विजयकुमार देशमुख यांनी यात चर्चेने तोडगा काढू, असे आश्वासन दिल्याने तूर्त हा विषय निवळला आणि लिलाव सुरु झाले. पण यामध्ये दोन तास लिलाव रखडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT