Pune News : वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरण सासवड विभागाने पुरंदर तालुक्यात ५ जुलैपासून ११५ गावांत ‘एक गाव एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत ७० गावांत हा उपक्रम राबवून वीज समस्यांचे निराकरण जागेवर करण्यात आले आहे. तर २६ ऑगस्टपर्यंत उर्वरित गावातही नियोजित तारखेला हा उपक्रम राबविला जात आहे.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या संकल्पनेतील ‘एक गाव एक दिवस’ हा उपक्रम असून, प्रभारी अधीक्षक अभियंता म्हसू मिसाळ व कार्यकारी अभियंता अरविंद वनमारे यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात याची युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू आहे.
या उपक्रमांत नवीन वीजजोडण्या तत्काळ देणे, वीजबिल तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे, नादुरुस्त वीज मीटर तत्काळ बदलणे, उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्यांची दुरुस्ती करणे, आवश्यक त्या ठिकाणी नवीन पोल उभारणे, लूज गाळ्यांना ताण देणे, वीज रोहित्रांची व रोहित्र पेट्यांची दुरुस्ती करणे, त्याचे केबल बदलणे यांसह ग्राहकांच्या विविध तक्रारींचे जागेवर निराकरण आदी कामे केली जात आहेत.
७० गावांमध्ये काम करताना १७४ ग्राहकांना जागेवर वीज जोडण्या देण्यात आल्या. वीजबिल दुरुस्तीची ६९, तर नावात बदलांची ४ प्रकरणे ‘ऑन द स्पॉट’ निकाली काढण्यात आली. २०४ रोहित्र पेट्यांची दुरुस्ती केली, तर झुकलेले १३४ खांब सरळ करण्यात आले.
खराब झालेले ३८ खांब बदलले व लांब असलेल्या गाळ्यात ३७ ठिकाणी नवीन खांब उभारले. याशिवाय ३२० सैल असलेल्या गाळ्यांना ताण दिला. तर २४२ गाळ्यांत स्पेसर्स बसविण्यात आले. तसेच १५ वीज ग्राहकांच्या सर्व्हिस वायरसुद्धा बदलण्यात आल्या. महावितरणने स्वत:हून गावात पोहोचून जागेवर समस्या निराकरण केल्याने वीज ग्राहकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.