Lumpy Vaccination Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Vaccination : एक लाख ३० हजार पशुधनाला साताऱ्यात लस

सद्यःस्थितीत जिल्ह्यात दोन लाख ८१ हजार ९०० लस उपलब्ध आहेत. बाधित क्षेत्रातील गावांमध्ये एक लाख ११ हजार ९२८ व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमध्ये १८ हजार ३२५ असे एकूण एक लाख ३० हजार २५३ पशुधनाचे लसीकरण पूर्ण केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

सातारा : जनावरांच्या लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराला रोखण्यासाठी लसीकरण (Lumpy Vaccination) सुरू आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात दोन लाख ८१ हजार ९०० लस उपलब्ध आहेत. बाधित क्षेत्रातील गावांमध्ये एक लाख ११ हजार ९२८ व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमध्ये १८ हजार ३२५ असे एकूण एक लाख ३० हजार २५३ पशुधनाचे (Livestock) लसीकरण पूर्ण केल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार (Dr. Ankush Parihar) यांनी दिली.

जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू झाला असून, आजअखेर ३७ जनावरे लम्पी स्कीन आजाराने दगावली आहेत. जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कऱ्हाड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा व जावळी असे नऊ तालुक्यांतील ६७ गावांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.

आतापर्यंत ४७८ गायी व ६२ बैल असे एकूण ५४० जनावरास लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. आजअखेर ३७ जनावरांना मृत्यू झाला आहे, तसेच ७६ गायी व ६ बैल, असे एकूण ८२ जनावरे नियमित उपचाराने बरी झालेली आहेत. उपचारासाठी सर्व आवश्यक औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघू पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत.

बाधित क्षेत्राच्या ५ किलोमीटर परिघातील एकूण ४०७ गावांतील एक लाख ३५ हजार ७६३ पशुधनास लस दिली आहे. या क्रमांकांवर साधा संपर्क... लम्पी स्कीन आजार औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात

अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर (१८००२३३०४१८) अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री १९६२ या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT