Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : एक कोटी बारा लाख टन उसाचे नगर विभागात गाळप

नगर जिल्ह्यात २१ व नाशिक जिल्ह्यात ५ असे २६ खासगी व सहकारी साखर कारखाने सुरू आहे. विभागात दररोजची १ लाख १० हजार टन ऊसगाळपाची क्षमता असली तरी सध्या दररोज ९२ ते ९५ हजार टन उसाचे गाळप होत आहे.

Team Agrowon

Sugarcane Crushing नगर ः विभागात यंदा आतापर्यंत एक कोटी अकरा लाख टन उसाचे गाळप (Sugarcane Season) झाले आहे. ऊसगाळपात (Crushing) नेहमीप्रमाणे खासगी कारखान्याचा बोलबाला कायम असून, अजून साधारण तीस लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे.

नगर जिल्ह्यात २१ व नाशिक जिल्ह्यात ५ असे २६ खासगी व सहकारी साखर कारखाने सुरू आहे. विभागात दररोजची १ लाख १० हजार टन ऊसगाळपाची क्षमता असली तरी सध्या दररोज ९२ ते ९५ हजार टन उसाचे गाळप होत आहे.

आतापर्यंत नगर जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांकडून ६७ लाख टन, तर खासगी साखर कारखान्यांकडून ३५ लाख टन असा एक कोटी टनापेक्षा अधिक ऊस गाळप झाला आहे.

नाशिक विभागात दहा लाख टनांपर्यंत उसाचे गाळप झाले आहे. गाळपात नेहमीप्रमाणे अंबालिका साखर कारखान्याने तेरा लाख टनाचे गाळप केले आहे.

गंगामाईनेही आठ लाखांपेक्षा अधिक टन उसाचे गाळप केले आहे. सहकारीमध्ये भेंडा येथील मारुतराव घुले, संगमनेरमधील भाऊसाहेब थोरात साखर कारखाना ऊसगाळपात पुढे आहे.

यंदा उसाचे साधारणपणे एक कोटी ८० लाखाच्या जवळपास गाळप होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता.

मात्र उसाचे घटते वजन पाहता यंदा एक कोटी दीड लाख टनापर्यंत उसाचे गाळप होणार असून अजून दीड ते दोन महिन्यांपर्यंत साखर कारखाने सुरू राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT