Pomegranate Agrowon
ताज्या बातम्या

Pomegranate Theft : सुकलवाडीतून दीड टन डाळिंबाची चोरी

Pomegranate Market : सुकलवाडी येथील अस्लम नासिरखान पठाण यांच्या शेतातील काढणीस आलेल्या भगवा जातीच्या दीड टन डाळिंबांची रात्री चोरट्यांनी चोरी केली आहे.

Team Agrowon

Pune News : सुकलवाडी येथील अस्लम नासिरखान पठाण यांच्या शेतातील काढणीस आलेल्या भगवा जातीच्या दीड टन डाळिंबांची रात्री चोरट्यांनी चोरी केली आहे. पठाण यांची तीन एकर डाळिंब बाग आहे. सध्या फळे तोडणीस सुरुवात झाली असून, डाळिंबाला प्रति किलो १४० रुपये असा भाव मिळत आहे.

ही संधी साधून चोरट्यांनी दीड टन तयार झालेल्या डाळिंबाच्या चोरीमुळे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. डाळिंब चोरांमुळे शेतकरी चिंतेत सापडले असून, रात्री जागता पहारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

अस्लम पठाण यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये जवळपास एक हजार डाळिंबाच्या झाडांची लागवड केली आहे. गतवर्षी सुरुवातीला डाळिंबाला चांगला दर मिळाला नव्हता. त्यातच मर, तेलकट डाग रोगासारख्या रोगाला डाळिंबाचे मोठे नुकसान झाले होते.

तरीही यंदा अस्लम पठाण यांनी चांगल्या दर्जाचे डाळिंबाचे पीक घेण्यास प्राधान्य दिले. त्यासाठी योग्य निगा राखून डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेतले. नुकतीच या डाळिंबाची तोडणी सुरू करण्यात आली होती. पुणे बाजार समितीमध्ये सध्या १०० ते १४० रुपये किलो बाजारभाव मिळाला असल्याने येत्या दोन-तीन दिवसांमध्ये पुन्हा तोडणी करुन डाळिंब विक्रीसाठी पाठवले जाणार होते.

दरम्यान घरी पै-पाहुणे आले असल्याने दोन दिवस बागेकडे फिरकले नाहीत. याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी बागेत येऊन अंदाजे दीड टन तयार झालेले डाळिंब घेऊन पोबारा केला. तर मोठ्या प्रमाणात डाळिंब तोडून खाली टाकून नुकसान केले.

दरम्यान, रविवार (ता. २७) आणि सोमवारी (ता. २८) अस्लम पठाण हे बागेमध्ये डाळिंबाची पाहणीसाठी गेले असता त्यांना बागेमध्ये ठिकठिकाणी फळे तोडून खाली गोळा करुन ठेवल्याचे दिसले त्याही पुढे जाऊन अधिक पाहणी केली असता चोरट्यांनी जवळपास दीड ते पावणेदोन टन डाळिंबाची चोरी केल्याचे निदर्शनास आले. याबाबत पठाण यांनी वाल्हे पोलिस दुरक्षेत्र येथे तक्रार दाखल केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT