Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : दोंडाईचा बाजार समितीच्या प्रारूप मतदारयाद्यांवर हरकती प्राप्त

दोंडाईचा (ता.शिंदखेडा) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रारूप मतदारयाद्यांवर ३० नोव्हेंबरअखेर आठ हरकती प्राप्त झाल्या आहेत.

टीम ॲग्रोवन

दोंडाईचा, जि.धुळे ः दोंडाईचा (ता.शिंदखेडा) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dondaicha APMC) प्रारूप मतदारयाद्यांवर ३० नोव्हेंबरअखेर आठ हरकती प्राप्त झाल्या आहेत. सहकारी संस्था मतदारसंघातून नवीन संचालक मंडळाची अंतिम मतदारयादी (Voter List) नाव समाविष्ट करण्यात यावे, असे स्वरूपाच्या हरकती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे कार्यालयात हरकती प्राप्त झाल्या आहेत, असे संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून समजले.

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची २१ नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार ३० नोव्हेंबरअखेर हरकती नोंदविण्यासाठी शेवटची मुदत होती. यात सहकारी संस्था मतदारसंघातून आरावे, चिमठावळ, कमखेडा नंबर दोन, मांडळ, पिंपरखेडा, वालखेडा नंबर एक या ठिकाणाहून हरकती प्राप्त झाल्या आहेत.

प्राप्त आक्षेप व हरकतींबाबत ९ पर्यंत निर्णय दिला जाणार आहे. अंतिम मतदारयादी १४ डिसेंबरला घोषित केली जाणार आहे. आगामी काळात होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.

ग्रामीण भागातील नवीनच सोसायटीच्या संचालकपदी निवड झालेल्या संचालकांना निवडणुकीची उत्सुकता लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT