Electricity Bill Agrowon
ताज्या बातम्या

Pending Electricity Bill : थकित वीजबिलावर आता वीस टक्के सवलत

पुणे परिमंडलातील २२,८२६ शेतकऱ्यांनी घेतला तीस टक्के सवलतीचा लाभ

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : शेतीपंपाच्या थकित वीजबिलावरील (Electricity Bill ) व्याज व दंडमाफी यांसह थकबाकीच्या रकमेत तीस टक्के सवलतीचा लाभ घेण्याची मुदत मार्चअखेर संपली.
महावितरणच्या पुणे परिमंडलातील २२ हजार ८२६ शेतकरी या योजनेचा लाभ घेतला. चालू वीजबिलांसह थकबाकीच्या ६८ कोटी रुपयांचा भरणा करत हे शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.

एप्रिलनंतर थकित वीजबिलांवर सवलतीची (Electricity Bill Discount) वीस टक्के रक्कम भरावी लागणार आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.

कृषिपंप धोरणांतर्गत शेतीपंपांच्या थकबाकीच्या पहिल्या टप्प्यात वीजजोडणी, वीजबिलाच्या रकमेत पन्नास टक्केसवलत देण्यात आली.

त्यानंतर सध्या सुरूअसलेल्या दुसऱ्या टप्प्यात शेतीपंपांच्या वीजबिलाच्या थकबाकीत तीस टक्के सवलत आणि व्याज व दंडमाफी मिळविण्यासाठी मार्चअखेरची मुदत होती.

पुणे परिमंडलामध्ये आतापर्यंत ५७ हजार २१० शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ८० कोटी ६१ लाख रुपयांचे चालू वीजबिल तसेच सुधारित थकबाकीपोटी ५५ कोटी ७३ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

या सर्व शेतकऱ्यांच्या वीजबिलांच्या थकबाकीवरील व्याज व दंड आणि तीस टक्के सवलतीतून एकूण ९८ कोटी ७९ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.

त्यापैकी २२ हजार ८२६ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत चालू वीजबिलांसह थकबाकीच्या ६८ कोटी रुपयांचा भरणा करून ते थकबाकीमुक्त झाले आहेत.

वीजबिल कोरे केलेल्या या शेतकऱ्यांना थकबाकीच्या रकमेतून ४० कोटी ६६ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.

दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांतील १ लाख २६ हजार २४२ शेतकऱ्यांकडे ९२६ कोटी ५९ लाख रुपयांची मूळ थकबाकी होती.

सरकारच्या योजनेअंतर्गत या थकबाकीवरील व्याज व दंड आणि तीस टक्के सवलतीतून एकूण १४५ कोटी ८५ लाख रुपये आतापर्यंत माफ करण्यात आले आहेत, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT