Water Supply Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजना प्रकरणात झेडपी अध्यक्ष, ‘सीईओं’ना नोटीस

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना विनाअट हस्तांतरासाठी ठराव न दिल्याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने येथील जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

Team Agrowon

अकोला ः जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना (Water Supply Scheme) विनाअट हस्तांतरासाठी ठराव न दिल्याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने येथील जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. यावर चार आठवड्यांपर्यंत खुलासा सादर करण्याचा वेळही देण्यात आला.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त व खारपाणपट्ट्यातील गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. या योजना पूर्ण झाल्यानंतर त्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने कोणत्याही अटीविनाच हस्तांतरित करून घेऊ, असे ठराव देणे आवश्यक होते. मात्र जिल्हा परिषदेने योजना देखभाल दुरुस्तीसाठी शासनाने अनुदान द्यावे, अशा अटी नमूद करून तो ठराव दिला.

परंतु शासन राज्यातील कोणत्याच जिल्हा परिषदेला असा निधी देत नाही. त्यामुळे याविरोधात याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका जिल्हा परिषद गटनेते गोपाल दातकर, सदस्य संजय अढाऊ, गोपाल भटकर, जगन्नाथ निचळ, अप्पू तिडके, अनसूयाबाई राऊत, योगेश्‍वर वानखडे, काँग्रेसचे सुनील धाबेकर, चंद्रशेखर चिंचोळकर आदींनी दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने ही नोटीस बजावली. जिल्ह्यातील विविध योजनांसाठी कोट्यवधींचा निधी खर्च होणार होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Success Story: गावरान लसूण उत्पादनातून मिळविली वेगळी ओळख

Environmental Conservation: वृत्तांत उप्पुगल गाव भेटीचा!

MGNREGA: ‘राम’भरोशावर रोजगार!

Sudhir Mungantiwar: ज्यांचं अन्न खाता, त्यांच्याशी तरी खोटे बोलू नका; ‘कृषी समृद्धी’वरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

Shirur Jambut APMC: जांबूत येथील उपबाजार १५ वर्षांपासून बंद अवस्थेत

SCROLL FOR NEXT