HTBT cotton tests Agrowon
ताज्या बातम्या

HTBT Cotton Seed : अवैध एचटीबीटी, पोटॅशचा काळाबाजार संबंधी मोहीम अधिकाऱ्यांना नोटीस

खानदेशातील अवैध एचटीबीटी (हर्बीसाईड टॉलरंट) कापूस बियाणे व पोटॅशचा काळाबाजार यासंबंधी नाशिक येथील विभागीय कृषी सहसंचालक यांनी जळगाव व धुळे जिल्ह्यातील मोहीम अधिकारी यांना नोटीस बजावली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील अवैध एचटीबीटी (हर्बीसाईड टॉलरंट) कापूस बियाणे व पोटॅशचा काळाबाजार यासंबंधी नाशिक येथील विभागीय कृषी सहसंचालक यांनी जळगाव व धुळे जिल्ह्यातील मोहीम अधिकारी यांना नोटीस बजावली आहे. आपणास निलंबित का करू नये, अशी विचारणा त्यात करण्यात आली आहे.

‘अॅग्रोवन’ने खानदेशातील पोटॅशची टंचाई व काळाबाजार आणि एचटीबीटीसंबंधीचा काळाबाजार, यामुळे होणारी शेतकऱ्यांची लूट व फसगत या बाबत मुख्य पानावर वृत्त प्रसिद्ध केले.

याची दखल कृषी विभागाच्या वरिष्ठांनी घेतली आणि जळगाव व धुळे येथील जिल्हा परिषदेतील कृषी विभागांमधील मोहीम अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. आठ दिवसांत त्याचे उत्तर मागितले असून, आपणास निलंबित का करू नये, अशी विचारणा केली आहे.

या वृत्तामुळे काळाबाजार करणाऱ्या मंडळीचे धाबे दणाणले असून, कृषी विभागाने यासंबंधी कारवाईसत्र राबविण्यास सुरुवात केली आहे. जळगाव, धुळे जिल्ह्यात कारवाईसाठी सापळे लावण्यात आले असून, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन माहिती गोळा करण्यात येत आहे.

कापूस व खतांच्या काळाबाजार यासंबंधी ठोस कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. मी स्वतः या कारवाई सत्रात सहभागी होईल. दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
- मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT