APMC Cess Agrowon
ताज्या बातम्या

APMC Cess : मालेगावात बाजार समितीतील खरेदीदारांना सेस वसुलीसाठी नोटीस

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदीदारांना थकीत सेस वसुलीसाठी मुख्य प्रशासक तथा उपनिबंधक डी. एच. राठोड यांनी नोटिसा पाठवल्या आहेत. सेसची रक्कम आठ दिवसांत न भरल्यास १२ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल, असे बजावले आहे.

टीम ॲग्रोवन

मालेगाव, जि. वाशीम ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदीदारांना थकीत सेस (APMC Cess) वसुलीसाठी मुख्य प्रशासक तथा उपनिबंधक डी. एच. राठोड यांनी नोटिसा पाठवल्या आहेत. सेसची रक्कम आठ दिवसांत न भरल्यास १२ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल, असे बजावले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर प्रशासक पदाचा पदभार जिल्हा उपनिबंधक डी. एच. राठोड यांनी घेतला. त्यांनी ३० ऑगस्टला प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसह शिरपूर येथील उपबाजाराला भेट दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांचे वेतन थकीत आहे.

विद्युत बिल व शासकीय देणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे बाकी आहे. तर, खरेदीदाराकडे २० लाख रुपयांपेक्षा जास्त सेस थकीत आहे. त्यामुळे प्रशासकांनी खरेदीदारांना सेसची रक्कम आठ दिवसांच्या आत भरण्यास सांगितले आहे. अन्यथा १२ टक्के दराने व्याज आकारण्यात येईल, असा इशारा दिला. शिरपूर उपबाजारात हळदीची खरेदी सुरू केल्यास कृषी बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिरपूर उपबाजारात हळदीची खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर भाव मिळेल.
तुकाराम गावंडे, शेतकरी, मालेगाव जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT