Dilip Walse Agrowon
ताज्या बातम्या

आरोपांना सामोरे न जाणे हे शूरपणाचे लक्षण नाही

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा टोला

टीम ॲग्रोवन

मुंबई :‘‘आरोप करणं सोपं असतं. मात्र स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही, हे शूरपणाचे लक्षण नाही,’’ असा जोरदार टोला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांना लगावला.
मंगळवारी (ता. १२) जनता दरबारात आले असता वळसे-पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला.
किरीट सोमय्या सध्या नॉटरिचेबल आहेत, या बाबत पत्रकारांनी विचारले असता ‘‘तुमचे झेड सिक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत, असे केंद्राला विचारू,’’ असे उत्तर वळसे-पाटील यांनी दिले.

‘‘सदावर्ते (sadavarte) प्रकरणाविषयी रीतसर चौकशी सुरू आहे. जी माहिती पोलिसांना मिळत आहे, ती माहिती न्यायालयात (court) देत आहेत. त्यामुळे चौकशीचा भाग काय आहे आणि नाही, यापेक्षा हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना उघड करणं योग्य नाही,’’ असेही वळसे-पाटील म्हणाले.

हल्ल्याबाबत पोलिसांचे दुर्लक्ष
‘‘सिल्व्हर ओक येथील हल्ल्याबाबत ४ एप्रिलला गुप्तचर विभागाने (
intelligence department) पत्र लिहून कळवलं होतं. तरीसुद्धा दुर्लक्ष झाले. जास्तीचा बंदोबस्त ठेवायला हवा होता. पण तेवढा ठेवला गेला नाही. त्यामुळे संबंधित डीसीपीची (DCP) बदली करण्यात आली आहे. तर गावदेवी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाला निलंबित केले आहे. अधिक चौकशी सुरू आहे. चौकशीत जे जे पुढे येईल, त्याप्रमाणे कारवाई करू,’’ असेही वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT