Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : नुकसान होऊनही विमा कंपन्यांना सूचना नाही, मदतीसाठी अडचण

उत्तर सोलापूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी तालुक्यातील सुमारे ८ हजार ७३ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे हप्ता भरला. यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस झाला. यात खरीप पिकांचे नुकसान झाले.

टीम ॲग्रोवन

वडाळा, जि. सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील (Kharip Season) पिकांसाठी तालुक्यातील सुमारे ८ हजार ७३ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे (Insurance Company) हप्ता भरला. यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठा पाऊस झाला. यात खरीप पिकांचे (Kharip Crop) नुकसान झाले.

नियमानुसार ७२ तासांत विमा कंपनीला याबाबतची माहिती कळवणे अपेक्षित होते. पण विमाधारक शेतकऱ्यांपैकी अद्यापही १ हजार ८३९ शेतकऱ्यांनी विमा कंपनीला ही माहिती कळवली नसल्याने त्यांच्या भरपाईचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यातील वडाळा व मार्डी मंडलांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला.

त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कांदा, तूर, भुईमूग आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले.अनेक भागांत पिकात सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच त्यानंतरही सातत्याने पाऊस होत राहिली. पण या पावसाच्या नुकसानीची माहिती संबंधित विमा कंपनीला शेततकऱयांनी कळवणे अपेक्षित आहे.

पण एकूण विमाधारक आठ हजार ७३ शेतकऱ्यांपैकी सहा हजार २३४ शेतकऱ्यांनीच पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिल. पण उर्वरित १ हजार ८३९ शेतकऱ्यांनी ही माहिती काही कळवलीच नाही, पण आता त्यांच्या नुकसानीचा विषय प्रलंबित राहणार आहे. अर्थात, हे शेतकरी आता वंचित राहणार आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील १८३९ शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकांवर अथवा क्रॉप इन्शुरन्स या अॅपवर तातडीने माहिती भरावी, अन्यथा पीकविम्यापासून हे शेतकरी वंचित राहतील.

- मनीषा मिसाळ, तालुका कृषी अधिकारी, उत्तर सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT