Nitish Kumar Agrowon
ताज्या बातम्या

Bihar Politics: नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

भाजपने (BJP) आपल्याविरोधात कट रचला, आपल्या पक्षाला अवमानपूर्वक वागणूक दिल्याचा आरोप करत नितीश कुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Team Agrowon

संयुक्त जनता दलाचे (JDU) सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी आठव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये संयुक्त जनता दल (JDU) आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) युतीचे सरकार स्थापन झाले. काँग्रेस आणि डाव्यांनीही या सरकारला पाठिंबा दिला आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देत नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससोबत हातमिळवणी करत नवे सरकार स्थापन केले आहे. बिहारच्या राजभवनात हा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. या शपथविधी सोहळ्याला तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी तसेच राजदचे नेते तेज प्रताप यादव हे देखील उपस्थित होते.

भाजपने (BJP) आपल्याविरोधात कट रचला, आपल्या पक्षाला अवमानपूर्वक वागणूक दिल्याचा आरोप करत नितीश कुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. त्यांनतर त्यांनी राज्यपाल फग्गु चौहान यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला.

राजीनाम्यानंतर नितीश कुमार यांनी लगेच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली. यानंतर महागठबंधनची बैठक झाली. ज्यामध्ये नितीश कुमार यांची नेतेपदी निवड करण्यात आली. महागठबंधनच्या बैठकीला काँग्रेस (Congress) आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT