Gram Panchayat Election Agrowon
ताज्या बातम्या

Gram Panchayat Election : सांगली जिल्ह्यात मातब्बरांना धक्का

तासगावात नऊ ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोचजणी (Gram Panchayat Election) मंगळवारी (ता. २०) सकाळी दहापासून सुरू झाली. उशिरापर्यंत काही ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले होते. मतमोजणीमध्ये (Vote Counting) जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीने (NCP) आघाडी घेतली असून दुसऱ्या क्रमांकावर भाजपने अधिक जागा मिळवल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

तासगाव आणि वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी, खानापूर तालुक्यात शिंदे गट, पलूस तालुक्यात कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. तर आटपाडी तालुक्यात भाजपने मुसंडी मारली. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीच्या निकालात मातब्बर स्थानिक नेत्यांना धक्का बसला आहे.

जिल्ह्यात ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी ३१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर ३१ ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. तर ४१६ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १८) सरासरी ८० ते ८५ टक्के मतदान झाले. मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्यात निकालाची उत्सुकता होती. दुपारपासून निकाल हाती येत होते. निकालानंतर कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करताना दिसत होते.

पडळकरवाडी या गावात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री सरपंचपदी विजयी झाल्या. काही ठिकाणी सरपंच एका पक्षाचा तर सत्ता दुसऱ्या पक्षाची असे चित्र दिसून आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भाजपचे शिवाजी डोंगरे यांना माधवनगर ग्रापंचयातीमध्ये धक्का बसला.

तर वाळवा तालुक्यातील पेठ हा भाजपचे राहुल महाडीक, सम्राट महाडीक यांचा बालेकिल्ला आहे; मात्र यंदा तिथे महाडीक गटाला पराभव स्वीकारावा लागला. येथे राष्ट्रवादीने सत्ता हस्तगत केली. तासगाव तालुक्यात ११ ठिकाणी सत्तांतर झाले. यामध्ये ९ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने सत्ता खेचून घेतली. तर एका ग्रामपंचायतीमध्ये भाजपने सत्ता मिळवली. वंजारवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजप-शिवसेनेने सत्ता मिळवली. आटपाडी तालुक्यात भाजपने मुसंडी मारली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Power Shortage: विजेखालचा अंधार

Paddy Farming Crisis: मुळशी तालुक्यात भातपिकावर दुहेरी संकट

Sahyadri FPC Turnover: सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची उलाढाल २६०९ कोटींवर

Farmer Death: पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच

Sugarcane Farmer Protest: धुराडे बंद पाडल्याशिवाय सोडणार नाही : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT