Tur rate  Agrowon
ताज्या बातम्या

Tur Rate : देशात नव्या तुरीला मिळतोय चांगला दर

देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र आवकेची गती सध्या कमी आहे. बाजारात आलेल्या तुरीचा हातोहात निपटारा होत असल्याने दरही टिकून आहेत.

Team Agrowon

पुणे : देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक (Tur) सुरु झाली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारांमध्ये आवक काहीशी जास्त आहे.

मात्र नव्या तुरीला उठावही चांगला मिळत आहे. त्यामुळे नव्या तुरीचे दरही तेजीत (high Tur Rate) आहेत.

देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र आवकेची गती सध्या कमी आहे. बाजारात आलेल्या तुरीचा हातोहात निपटारा होत असल्याने दरही टिकून आहेत.

सध्या कर्नाटकातील काही बाजारांमध्ये आवकेचा दबाव वाढला. तर महाराष्ट्रातील सोलापूर, जालना, अकोला, अमरावती या मोठ्या बाजारांमध्ये आवक वाढताना दिसत आहे.

मागील हंगामातील तूर आता कमी शिल्लक आहे. तसेच साठवणूकदार नफावसुलीच्या मानसिकतेत दिसत आहेत. त्यामुळे बाजारातील आवक मर्यादित आहे.

मध्य प्रदेशातील दाल मिल्सना तुरीची टंचाई

मध्य प्रदेशातील दाल मिल्सना तुरीची टंचाई भासत आहे. त्यामुळे येथील दाल मिल्सनी आता कर्नाटक आणि महाराष्ट्रात तुरीची खरेदी सुरु केली आहे.

त्यामुळे या दोन्ही राज्यांतील बाजारात तूर चांगलाच भाव खात आहे.

देशातील तुरीचे दर तेजीत असल्याने निर्यातदार देशांनीही दरात काहीशी वाढ केली.

सध्या आफ्रिकेतील मालावी, मोझांबिक, टांझानिया या देशांमध्ये तुरीचा साठा खूपच कमी आहे. आता म्यानमार देशातून तूर आयात होऊ शकते.

त्याचही प्रमाण जास्त नसेल. त्यातच यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं यंदा गेल्यावर्षीऐवढी आयात झाली तरी पुरवठा जास्त वाढणार नाही.

दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज

तुरीच्या मागणी आणि पुरवठ्यात यंदा तफावत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत राहतील. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. हा दर यंदाच्या हंगामात कायम राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT