Mehrghar Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Mehrghar Scheme : मेळघाटातील माहेरघरांची दुरवस्था कोट्यवधींचा खर्च करून शासनाचे दुर्लक्ष

आदिवासीबहुल भागातील गर्भवती मातांसाठी शासनाने चांगल्या उद्देशाने सुरू केलेली माहेरघर योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

Team Agrowon

चिखलदरा, अमरावती : आदिवासीबहुल भागातील गर्भवती मातांसाठी शासनाने चांगल्या उद्देशाने सुरू केलेली माहेरघर योजना (Mehrghar Scheme) बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणी या माहेरघराला कुलूप लागलेले दिसून येत असल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा झाल्याचे बोलले जात आहे.

माहेरघर ही योजना राज्य शासनाने एका चांगल्या उद्देशाने सुरू केली. बहुतांश आदिवासी लोकसंख्या ही डोंगराळ प्रदेशात पाड्यांमध्ये वास्तव्याला असते. आदिवासी पाड्यांमध्ये अनेक ठिकाणी पक्के रस्ते नाहीत तसेच पक्के रस्ते असल्यास गर्भवती महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात पोहोचण्यासाठी वाहतूक व्यवस्था वेळेवर उपलब्ध होत नाही.

त्यामुळे मातामृत्यू व बालमृत्यू वाढण्यास कारण ठरतात. तसेच मोबाईल सेवा व इतर असुविधा लक्षात घेता राज्य शासनाने २०१०-११ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माहेरघर योजना सुरू केली. सध्या धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत नऊ ठिकाणी माहेरघर बांधण्यात आले असून, त्यामध्ये टेंब्रूसोंडा, काटकुंभ, सेमाडोह, हातरू, कळमखार, साद्राबाडी, बैरागड, धूळघाट रेल्वे आदी ठिकाणांचा समावेश आहे.

याठिकाणी माहेरघर बांधण्यात आले असून सद्यःस्थितीत या इमारतींची दुरवस्था झाली आहे. बऱ्याच ठिकाणचे माहेरघर सध्या बंद पडले आहे. शासनाने योजना सुरू झाली तेव्हापासून कोट्यवधी रुपयांचा निधी या माहेरघर योजनेवर खर्च केला. मात्र आता या माहेरघर योजनेवर खर्च केलेला निधी वाया जाताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणच्या या इमारती नेहमी बंद असतात. त्यामुळे मेळघाटातील हे माहेरघर सध्या शोभेच्या वास्तू ठरत आहेत.

मेळघाटात नऊ ठिकाणी माहेरघर बांधण्यात आले असून, काही ठिकाणचे माहेरघर सध्या बंद आहे. तर उर्वरित चालू आहेत तसेच माहेरघरमध्ये तीन चार दिवसांआधी गर्भवती महिलेला भरती करण्यात येते. मात्र माहेरघरमध्ये कोणीच भरती होत नसल्यामुळे अनेक ठिकाणचे माहेरघर बंद आहेत. तसेच सध्या अनेक ठिकाणी डिलिव्हरी वॉर्ड असल्यामुळे त्या ठिकाणी रुग्ण ठेवण्यात येतात.

- डॉ. दिलीप रणमाले, जिल्हा आरोग्य अधिकारी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT