NCDEX Award  Agrowon
ताज्या बातम्या

NCDEX Commodity Award :कृषी विकास संस्थेला ‘एनसीडीईएक्स कमोडीटी ॲवॉर्ड’

NCDEX Commodity Award News : कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मागील ३१ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कृषी विकास संस्थेला उल्लेखनीय कार्यासाठी ‘एनसीडीईएक्स कमोडिटी ॲवॉर्ड’ देण्यात आला.

Team Agrowon

Buldana News : कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मागील ३१ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कृषी विकास संस्थेला उल्लेखनीय कार्यासाठी ‘एनसीडीईएक्स कमोडिटी ॲवॉर्ड’ देण्यात आला. नाबार्डचे अध्यक्ष के. व्ही. सहजी यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्काराचे वितरण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे यांना करण्यात आले.

कृषी विकास संस्था सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातमधील दीड लाखापेक्षा जास्त कुटुंबा सोबत प्रत्यक्ष कार्य करीत आहे. कृषी विकास संस्थेच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात कृषी, जलसंधारण, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, महिला सक्षमीकरण, अपारंपरिक ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अशा विविध विषयांवर काम करण्यात येत आहे.

संस्थेने स्थापन केलेल्या जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीला सुद्धा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारसुद्धा देण्यात आला आहे. तसेच संस्थेने काम केलेल्या अनेक गावांना सुद्धा आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड (NCDEX) या संस्थेमार्फत बाजारातील सहभागींना कमोडिटी डेरिव्हेटिव्हजमध्ये व्यापार करण्यासाठी कमोडिटी एक्सचेंज प्लॅटफॉर्म प्रदान केला जातो. या माध्यमातून शेतीमालाच्या भावातील जोखीम कमी करण्यासाठीचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या पार्श्‍वभूमीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत काम करून त्यांना सक्षम करण्यासाठी, शेतीमालाच्या भावातील जोखीम कमी करण्यासाठी व कमोडिटी मार्केटच्या माध्यमातून शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या देशातील दोन संस्थांना सदर पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton MSP: हमीभावाने कापूस विक्रीसाठी ४० हजार शेतकरी प्रतीक्षेत

Tamarind Price: अहिल्यानगरमध्ये चिंचेला प्रति क्विंटल २५००० रुपये दर

Sugar Purchase Enquiry: साखर खरेदीसाठी केवळ चौकशीच; करार नाहीत

Grape Packing Material Price: द्राक्ष पॅकिंग मटेरिअल दरात १५ टक्क्यांपर्यंत वाढ

Maharashtra Weather: राज्यात वादळी पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT