Godavari river Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Rain : अखेर गोदामाई खळाळली! दुतोंड्या मारुतीच्या बेंबीला लागलं पाणी

Godavri River Water level : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासून जोरदार कमबॅक केले. नाशिक जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे दिवसांनंतर दुतोंड्या मारुतीच्या बेंबीला पाणी लागल्याने नाशिककर सुखावले आहेत.

Swapnil Shinde

Gangapur Dam : आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला होता. दरम्यान, दोन दिवसांपासून राज्यभरात सर्वदूर वरुणराजाने कृपादृष्टी केली असून, शुक्रवारी (ता. ८) पहाटेपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार हजेरी लावली आहे. गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने धरणातून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नाशिकची गोदावरी नदी अनेक महिन्यानंतर पुन्हा खळखळू लागली.

अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी पहाटेपासून पावसाने नाशिकसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यात पडत असलेल्या सर्वदूर पावसाने गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे गंगापूर धरणातून 6282 क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा खळखळू लागली.

गोदावरीच्या पुराचे मापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीला (Dutondya Maruti) यंदा पुराचे पाणीच लागलेले नव्हते. पण शुक्रवारी दुपारपासून नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्यानंतर दुतोंड्या मारुतीच्या बेंबीला पाणी लागल्याने नाशिककर सुखावले आहेत. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग (Water Discharged) वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT