Minister Dada bhuse Agrowon
ताज्या बातम्या

Dada Bhuse : नाशिक जिल्ह्याची सर्वांगीण विकासाच्या दिशेने यशस्वी वाटचाल

Team Agrowon

Nashik News : शिक्षण, आरोग्य, औद्योगिक अशा विविध क्षेत्रात नाशिक जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमांना नागरिकांची साथ मिळत असून जिल्हा विकासाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त भुसे यांच्या हस्ते ध्‍वजवंदन झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने तृणधान्य पिकांची उत्पादन वाढ व तृणधान्याचा आहारातील समावेश वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात ३ हजार ३३५ कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

तसेच कृषी विभागामार्फत जिल्ह्यात विविध कृषी विषयक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र समूह विकास कार्यक्रमाअंतर्गत नाशिक द्राक्ष क्लस्टरसाठी रुपये ३०० कोटी मंजूर करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, लाचलुचपत प्रतिबधंक विभाग, पोलीस अधीक्षक आदर्श तलाठी पुरस्कार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, कामगार आयुक्त, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संबधित पुरस्कारांचे वितरण भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT