Kharif Sowing |Kharif Paisewari |  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Paisewari : नांदेड जिल्ह्याची खरिपाची अंतिम पैसेवारी ४६ पैसे जाहीर

जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजरी पैसेवारीसह (Kharif Season) सुधारित पैसेवारी जाहीर केली होती. यानंतर गुरुवारी (ता. १५) अंतिम पैसेवारी (Kharif Paisewari) जाहीर झाली. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी ४८ पैसे जाहीर करून जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना कळविले आहे. यानंतर पीक कापणी प्रयोगाच्या (Crop Harvesting Experiment) आधारावर जाहीर होणाऱ्या उत्पादकतेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो. जिल्ह्यात असलेल्या एक हजार ५६२ गावांत आठ लाख ४४ हजार ३४७ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यापैकी यंदा सात लाख ९५ हजार ९९ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली आहे.

या पेरणीक्षेत्रात पेरलेल्या पिकांच्या परिस्थितीचा अंदाज ३० सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या हंगामी नजरी पैसेवारीवरुन व्यक्त करण्यात आला होता. यात तीन तालुक्यांची पैसेवारी पन्नासपैशापेक्षा अधिक तर उर्वरित १३ तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाला होता. यानंतर सुधारित अंदाज ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला.

यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाल्याचा अहवाल प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता. यानंतर गुरुवारी (ता. १५) अंतिम पैसेवारी जाहीर झाली. यातही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ४८ पैसे जाहीर केली आहे. खरिपातील अंतिम पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली जाहीर झाल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विभागीय आयुक्तांना कळविले आहे.

यामुळे जिल्ह्यात खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे शासनाकडून नुकसानग्रस्तांसाठी सोयी सुविधा लागू होणार आहेत. यासोबतच कृषी, महसूल व ग्रामविकास यंत्रणेच्या संयुक्तिक पद्धतीने घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तालुकानिहाय अंतिम पैसेवारी (कंसात गावांची संख्या)

नांदेड ४८ (८८), अर्धापूर ४८ (६४), कंधार ४७ (१२६), लोहा ४४ (१२७), भोकर ४९ (७७), मुदखेड ४९ (५५), हदगाव ४९ (१३७), हिमायतनगर ४७ (६४), किनवट ४७ (१९१), माहूर ४७ (९२), देगलूर ४८ (१०८), मुखेड ४९ (१३५), बिलोली ४७ (९१), नायगाव ४८ (८९), धर्माबाद ४८ (५६), उमरी ४९ (६२). (नांदेड तालुक्यातील १३ गावांचे नागरिकरण झाले आहे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT