Grampanchyat Election Agrowon
ताज्या बातम्या

Grampanchyat Election : प्रस्थापितांना धक्के अन्‌ तरुणांना संधी

जिल्ह्यात १९२ ग्रामपंचायतींचा निकाल

Team Agrowon

नगर : जिल्ह्यातील १९२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे मंगळवारी (ता. २०) मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आले. यात बहुतांश ठिकाणी तरुणांना संधी मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. निकालानंतर अनेक प्रस्थापितांना धक्का बसला. या निवडणुकीत त्या-त्या भागातील नेत्यांनी आपले वर्चस्व बऱ्यापैकी राखल्याचे दिसून येत आहे.

नगर जिल्ह्यात दोनशे तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर १९२ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता.१८) मतदान होऊन मंगळवारी (ता.२०) सकाळी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आले.

शेवगाव तालुक्यामध्ये आठ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्या असून, तीन ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली. एका ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीची सत्ता आली. संगमनेर तालुक्यात २५ ग्रामपंचायतींवर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची सत्ता आली, तर आठ ग्रामपंचायती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेल्या.

पाथर्डी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या निकालात तिसगाव भालगाव या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना धक्का बसला. नेवासा तालुक्यात १३ पैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती, उर्वरित बारा ठिकाणी झालेल्या निवडणुकांत बहुतांश ठिकाणी आमदार शंकरराव गडाख यांच्या गटाची सत्ता आली. श्रीगोंदा तालुक्यामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांना काष्टीत धक्का बसला. बेलवंडीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार यांनी सत्ता राखली. नगर तालुक्यामध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्याकडे बऱ्यापैकी ग्रामपंचायतीची सत्ता आली. राहुरीत आमदार प्रसाद तनपुरे, राहत्यात राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगावात कोल्हे आणि काळे गटाने आपापल्या करील बहुतांश ग्रामपंचायतींची सत्ता राखली. शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. थेट सरपंचपदाची निवडणूक जनतेतून करण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी नवख्या आणि तरुणांना सरपंचपदाची संधी मिळाली आहे. सदस्य निवडून आणले तरी अनेक ठिकाणी प्रस्थापितांना सरपंचपदाबाबत लोकांनी नाकारल्याचे या निवडणुकीत दिसून आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT