Mustard Production Agrowon
ताज्या बातम्या

Mustard Production : मोहरी उत्पादन ११५ लाख टनांवर पोहोचणार

यंदा विक्रमी उत्पादनाचा ‘एसईए’चा अंदाज

Team Agrowon

Mustard Market :देशात मागील दोन वर्षे मोहरीला चांगला दर (Mustard Rate) मिळला. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात (Rabbi Season) मोहरीची लागवड वाढवली.

परिणामी यंदा मोहरीचे उत्पादन विक्रमी ११५ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एसईए) व्यक्त केला आहे.

कोरोना काळात देशात खाद्यतेलाचा तुटवडा होता. त्यामुळे तेलाचे दर तेजीत होते. परिणामी मोहरीसह सोयाबीनचे दरही तेजीत आले.

मागील हंगामात मोहरीला ७ ते ८ हजार रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे सलग दुसऱ्यावर्षी शेतकऱ्यांनी मोहरीची लागवड वाढवली. यंदाही मोहरीची लागवड ९८ लाख हेक्टरवर झाली. त्यामुळे यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज केंद्र सरकारनेही व्यक्त केला.

‘एसईए’ने मार्च महिन्याच्या सुरुवातील देशातील मोहरी पिकाचा सर्व्हे केला. यातून ही माहिती समोर आली. ‘एसईए’ने २०२५-२६ पर्यंत देशातील मोहरी उत्पादन २०० लाख टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

त्यासाठी मॉडेल मस्टर्ड फार्म प्रोजेस्ट सुरू करण्यात आला. या प्रोजेक्टचा सकारात्मक परिणाम पुढे येत असल्याचाही दावा ‘एसईए’ने केला.

‘एसईए’कडून ९ राज्यांत सर्वेक्षण
‘एसईए’ने आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाना, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या नऊ राज्यांमध्ये सर्वेक्षण केले.

यातून देशात यंदा जवळपास ९६ लाख हेक्टरवर मोहरीचे पीक आहे. तर केंद्राने यंदा ९८ लाख हेक्टरवर मोहरी पीक असल्याचे म्हटले आहे.

यंदा मोहरीची प्रतिहेक्टरी उत्पादकता १ हजार २०३ किलोवर पोहोचण्याचा अंदाज आहे. यातून देशात यंदा ११५ लाख टन उत्पादन होईल, असे ‘एसईए’ने म्हटले आहे.

केंद्र सरकारचा अंदाज
केंद्र सरकारने १४ फेब्रुवारीला देशातील पीक उत्पादनाचा दुसरा अंदाज जाहीर केला. या अंदाजात केंद्राने १२८ लाख टन मोहरी उत्पादन होईल, असे म्हटले आहे. गेल्या हंगामात देशात १२० लाख टन उत्पादन झाले होते.

त्यात यंदा ८ लाख टनांची भर पडेल. यंदा राजस्थानमधील उत्पादन जवळपास ४५ लाख टनांवर पोहोचेल. तर मध्य प्रदेशात १८ लाख टन आणि उत्तर प्रदेशात १७ लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज केंद्राने जाहीर केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT