mushroom production 
ताज्या बातम्या

Mushroom : आंबेगाव, जुन्नरमधील आदिवासी महिलांना मशरूमचे प्रशिक्षण

शाश्‍वत संस्था जुन्नर व टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील आदिवासी भागातील बचत गटांमधील ९९८ महिलांना मशरूम लागवडीचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती शाश्‍वत संस्था जुन्नरचे अध्यक्ष बुधाजी डामसे व सचिव दुंदा जढर यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

फुलवडे ः शाश्‍वत संस्था जुन्नर व टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील आदिवासी भागातील बचत गटांमधील ९९८ महिलांना मशरूम लागवडीचे (Mushroom Cultivation) प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती शाश्‍वत संस्था जुन्नरचे अध्यक्ष बुधाजी डामसे व सचिव दुंदा जढर यांनी दिली.

आदिवासी महिलांना शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून मशरूम लागवडीचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी शाश्‍वत संस्था व टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख रोहित सरोज व लीतेश अत्तारदे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार २५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात आंबेगाव तालुक्यातील कोंढवळ, तेरुंगण, राजपूर, तळेघर, जांभोरी, चिखली, आहुपे, डोण, कोंढरे, तसेच जुन्नर तालुक्यातील ५८ गावांतील आदिवासी महिलांना शाश्‍वत संस्थेच्या कार्यकर्त्या पुष्पा शेळके, मंदा भोकटे, अनिता असवले, पुष्पा नाडेकर, आशा डावखर, जिजा भालचिम यांनी वाड्या-वस्त्यांवर जाऊन महिलांना प्रशिक्षण दिले.

‘‘जे बचत गट मशरूम व्यवसाय सुरू करतील, त्या बचत गटातील महिलांना शाश्‍वत संस्थेमार्फत ५ किलो बीज मोफत देण्यात येणार आहे. बचत गटांनी तयार केलेले मशरूम सुकवून १,२०० ते १,५०० रुपये किलो दराने भीमाशंकर मत्स्य, कृषी व वन उपज प्रोड्यूसर कंपनी खरेदी करणार आहे.

तरी जास्तीत-जास्त महिला बचत गटांनी हा व्यवसाय सुरू करावा,’’ असे आवाहन शाश्‍वत संस्थेमार्फत करण्यात आले आहे. मागील वर्षी आयआयटी पवई यांच्यामार्फत ३५० महिलांना मशरूमचे प्रशिक्षण दिले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT