Ratnagiri Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : पुणे जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस

Monsoon Update : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. या पावसामुळे खरीप पेरण्यांची लगबग सुरू झाली असून काही ठिकाणी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्याची स्थिती कायम आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. या पावसामुळे तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. रविवारी (ता. २५) दिवसभर पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून पडत होत्या. डोंगराळ व घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा अधिक होता. या पावसामुळे भात पट्ट्यात रोपवाटिकेच्या कांमाना सुरुवात झाली आहे.

मात्र, ज्या शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीने भात बियाण्यांच्या लागवडी केल्या आहेत. त्यासाठी हा पाऊस पोषक असल्याने अनेक ठिकाणी लागवडी उगवून वर आल्या आहेत. तर पूर्व भागातील तालुक्यात पावसाचा जोर नसला तरी अनेक ठिकाणी तुरळक शिडकावा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

हवेली तालुक्यात सोमवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे वेधशाळा ९.८ मिलिमीटर, तर केशवनगर ९.८, कोथरूड ३.८, खडकवासला १५.५, थेऊर ३.८ पाऊस पडला असून उरुळीकांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली भागांतही हलक्या सरी कोसळल्या आहेत. मुळशीतील माले येथे ४७.३ मिलिमीटर, तर मुठा ३३.८ मिलिमीटर पाऊस पडला असून पौड, घोटावडे, थेरगाव, पिरंगुट या भागांत पावसाचा जोर कमी होता.

भोरमधील आंबवडे ३०.८ मिलिमीटर, संगमनेर २१.८, निगुडघर ६०.३ भोर २४, भोलावडे २६.८ मिलिमीटर, तर नसरापूर, किकवी, वेळू भागांत तुरळक सरी पडल्या. मावळमधील काले ६२.५ मिलिमीटर, कार्ला ४४.३, खडकमाळ २८.०, लोणावळा ६१, शिवणे २८ मिलिमीटर, तर वडगाव मावळ, तळेगाव भागांत कमी पाऊस होता. वेल्ह्यातील वेल्हा येथे ६३.३ मिलिमीटर, पानशेत २५.५, तर विंझर, आंबवणे येथे पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर भागांत अधूनमधून पाऊस पडला. खेडमधील वाडा,

राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडूस, आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव, मंचर. शिरूरमधील टाकळी,

वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ, तर बारामतीमधील माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी भागात तुरळक सरी पडल्या

तसेच इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, अंथुर्णे, सणसर, दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड, तर पुरंदरमधील सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा या भागांतही पावसाच्या तुरळक सरी पडल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT