Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : मॉन्सूनचा देशाला रामराम

यंदा देवभूमी केरळमध्ये नियमित वेळेच्या तीन दिवस आधीच (२९ मे ) पोचून, १६ जून रोजी मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला. २ जुलै रोजी राजस्थानसह संपूर्ण देशभरात मॉन्सून दाखल झाला.

टीम ॲग्रोवन

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) (Monsoon Rain) रविवारी (ता. २३) उर्वरित महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा निरोप (Monsoon Withdraw From India) घेतला. दक्षिण भारतातील राज्यात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने (Weather Department)जाहीर केले. देशामध्ये २९ मे रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल ४ महिने २५ दिवस मुक्काम रविवारी (ता. २३) करून संपूर्ण देशाचा निरोप घेतला.

यंदा देवभूमी केरळमध्ये नियमित वेळेच्या तीन दिवस आधीच (२९ मे ) पोचून, १६ जून रोजी मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला. २ जुलै रोजी राजस्थानसह संपूर्ण देशभरात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर वायव्य भारतात यंदा २ महिने १८ दिवस मुक्काम करत मॉन्सूनने २० सप्टेंबर रोजी राजस्थान, कच्छ मधून परतीचा प्रवास सुरू केला. परतीचा प्रवास काहीसा अडखळत करत अखेर रविवारी (ता. २३) मॉन्सून उर्वरित महाराष्ट्रासह देशातून परतला आहे.

...असा कोसळला यंदा पाऊस

यंदा मॉन्सून हंगामात (१ जून ते ३० सप्टेंबर) देशात ९२५.० मिलिमीटर सरासरीपेक्षा ६ टक्के अधिक पाऊस पडला. तर महाराष्ट्रात १२१९.७ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा २३ टक्के अधिक पाऊस पडला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातही राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. १ ऑक्टोबरपासून रविवारपर्यंत (ता.२३) राज्यात १३२.३ मिलिमीटर (१०२ टक्के अधिक) पाऊस झाला आहे.

परतीच्या प्रवासाची वाटचाल

वर्ष तारीख

२०१८ २१ ऑक्टोबर

२०१९ १६ ऑक्टोबर

२०२० २८ ऑक्टोबर

२०२१ २५ ऑक्टोबर

२०२२ २३ ऑक्टोबर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT