Clouds Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Monsoon Alert : राज्यात मॉन्सूनचा पाऊस काहीसा कमजोर

Maharashtra Monsoon Update : राज्यात पावसाला पोषक हवामान असले तरी, मॉन्सूनचा पाऊस काहीसा कमजोर झाला आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Maharashtra IMD Rainfall Alert : राज्यात पावसाला पोषक हवामान असले तरी, मॉन्सूनचा पाऊस काहीसा कमजोर झाला आहे. आज (ता. २३) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या काहीसा उत्तरेकडे सरकला आहे. हा आस पंजाबच्या अमृतसर, कर्नाल, मेरठ, लखनौ, गया, मालदा ते नागालँडपर्यंत विस्तारला आहे. मध्य प्रदेशाच्या मध्य भागात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा पूर्व पश्चिम कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर तमिळनाडू आणि रायलसीमा भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ

राज्यात ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. तुरळक ठिकाणी एखादी दुसरी सर येत आहे. आज (ता. २३) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT