Monsoon Prediction Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Prediction : माॅन्सून कधीपासून परतीच्या प्रवासावर निघणार ?

पुढील दोन दिवसांत माॅन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता हवामान विभगानं विर्तविली. तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तविला आहे. Monsoon Return

Team Agrowon

माॅन्सूनच्या (Monsoon Update) परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. पुढील दोन दिवसांत माॅन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता हवामान विभगानं विर्तविली. तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही (Heavy Rainfall) हवामान विभागानं वर्तविला आहे.

केंद्रभागी जास्त भाग असणारी आणि वारे बाहेरच्या दिशेने फेकणारी प्रणाली (अॅन्टी सायक्लोन) तयार झाली आहे. त्यामुळं पश्चिम राजस्थान, पंजाब आणि हरियानामध्ये पुढील ५ कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. ही पोषक स्थिती असल्यामुळं बुधवारपर्यंत माॅन्सून वायव्य भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाना आणि गुजरातच्या काही भागातून माॅन्सून माघारी फिरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली.

राज्यातही काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये काही मंडळात जोरदार पाऊस झाला. तर बहुतांशी ठिकाणी हलक्या सरी पडल्या. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी होता. तसचं मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली. धुळे आणि जळगाव जिल्ह्यात बहुतांशी भागांत पावसानं हजेरी लावली होती. तर नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस झाला. पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही बहुतांशी मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली.

मराठवाड्यातील काही मंडळात विजांसह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, बीड, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. विदर्भातही अनेक मंडळांत विजांसह हलक्या पावसानं हजेरी लावली.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक राहील, असा अंदाजही हवामान विभागानं जारी केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lucerne Fodder: एकदा लागवड, तीन वर्षे चारा! पशुपालकांसाठी लसूणघास फायदेशीर

Fruit Insurance Refund: फळ पीकविमा परतावा अप्राप्त

Rabies Prevention Tips: रेबीज रोखण्यासाठी लसीकरणासह जनजागृती आवश्यक

Water Storage: प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरले

Fruit Crop Insurance: फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT