MLA Saroj Ahire Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Session : अडीच महिन्यांचा प्रशंसक दिसला विधान भवन परिसरात

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. १९) पासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या.

टीम ॲग्रोवन

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter session) सोमवार (ता. १९) पासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ (MLA Saroj Ahire) या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या.

‘मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्त्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले,’ अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे. ३० सप्टेंबरला त्याचा जन्म झाला. त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या.

कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधिक सोडविण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’साठी ६२०० हेक्टर घेणार

Farmers Meeting: केंद्रीय कृषिमंत्री आज साधणार शेतकरी संघटनांशी संवाद

Animal and Fisheries Skill Development: कौशल्यांद्वारे पशुपालन, मत्स्योद्योगाला मिळणार गती

Agriculture Department Incorrect Structure: आस्थापना प्रमुखावर कारवाई करा

India Reservoir Storage: देशातील जलाशयांत पाणीसाठा पोहोचला ७०.३ टक्क्यांवर

SCROLL FOR NEXT