Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पिकांच्या पंचनाम्यांत विमा कंपनीची अफरातफर

नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करताना विमा कंपनीने अफरातफर केल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे.

Team Agrowon

Chandrapur Insurance News : नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान (Crop Damage) झालेल्या पिकांचे पंचनामे (Crop Damage Survey) करताना विमा कंपनीने (Crop Insurance Company) अफरातफर केल्याचे कृषी विभागाच्या (Agriculture Department) निदर्शनास आले आहे. ही बाब उघडकीस येताच जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आढावा बैठक घेत या बाबत त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे उपस्थित होते.

कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी आणि विमा कंपनीचा प्रतिनिधी हे संबंधित शेतकऱ्यांसमोर पिकांचे पंचनामे करीत असतात. मात्र, विमा कंपनीने शेतकऱ्यांसमोर केलेल्या पंचनाम्यात अफरातफर केल्याचे समोर आले आहे.

यात मूळ पंचनाम्यात खोडाखोड, बनावट स्वाक्षरी, आकड्यांमध्ये तफावत, वेगळे शिक्के, बनावट झेरॉक्स असे प्रकार काही तालुक्यांमध्ये आढळून आले आहेत.

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी

अफरातफर जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देताच कृषी विभागाचे अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली.

पंचनाम्यांमधील आकड्यांत तफावत, खोडाखोड, व्हाईटनर लावून पुन्हा लिहिलेले असे वेगवेगळे वर्गीकरण करून तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्वरित जिल्हा मुख्यालयी माहिती सादर करावी.

जेणेकरून, विमा कंपनीकडून मूळ पंचनाम्यांची प्रत उपलब्ध करणे सोपे होईल. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT