Banana Rate Agrowon
ताज्या बातम्या

Banana Market Rate : केळी दरात किंचित सुधारणा

Banana Price Update : खानदेशातून सध्या रोज १२ कंटेनर केळीची आखातात निर्यातही होत आहे. दरात किंचित सुधारणा झाल्याने काहीसा दिलासा आहे. परंतु कमाल दर २००० रुपये असावेत, अशी अपेक्षादेखील शेतकऱ्यांना आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon Banana Market : हंगामी फळांची रेलचेल सुरू झाल्याने केळीचा उठाव कमी झाला होता. परंतु उठाव वाढल्याने दरात (Banana Rate) किंचित सुधारणा झाली असून, किमान ६०० व कमाल १३०० रुपये प्रतिक्विटलचा दर केळीला मिळत आहे.

केळीची आवक स्थिर आहे. खानदेशात सध्या रोज १८५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. मध्यंतरी आवक वाढल्याने दर दबावात होते. किमान दर ५०० व कमाल दर ९०० ते १००० रुपये, असे होते.

अनेकांच्या दर्जेदार केळीची खरेदी ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल या दरात झाली. मार्चमध्ये दर २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. तर आखातात पाठविल्या जाणाऱ्या केळीला ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळाला होता.

एप्रिलमध्ये त्यात घसरण सुरू झाली. ही घसरण थांबलीच नाही. कारण स्थानिक बाजारात उठाव कमी झाला.

परदेशातील निर्यात खानदेशातून रोज १० ते ११ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) सुरू होती. परंतु आवक वाढली व स्थानिक बाजारात आंबा, चिकू, कलिंगड, द्राक्षे, काकडी आदींची उपलब्धताही मुबलक होती.

द्राक्षांचे दर ४० रुपये किलो, असे किरकोळ बाजारात खानदेशात होते. तसेच कलिंगडदेखील आवाक्यात होते. परिणामी केळीचा उठाव कमी झाला. परंतु सध्या कलिंगड, द्राक्षे बाजारात दिसेनासे होवू लागले आहेत.

चिकूची आवकही घटली आहे. तसेच उत्तर भारतात केळीची पाठवणूक वेगात सुरू आहे. परिणामी केळी दरात सुधारणा झाली आहे.

खानदेशातून सध्या रोज १२ कंटेनर केळीची आखातात निर्यातही होत आहे. दरात किंचित सुधारणा झाल्याने काहीसा दिलासा आहे. परंतु कमाल दर २००० रुपये असावेत, अशी अपेक्षादेखील शेतकऱ्यांना आहे.

कारण केळीची विक्री ७०० ते १००० रुपये या दरात फारशी परवडत नाही, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही केळी दरात सुधारणा झाली आहे. तेथे किमान ८०० व कमाल १८५० रुपये प्रतिक्विंटलचा दर केळीला मिळत आहे.

तेथे सध्या रोज १२० ते १२२ ट्रक केळीची आवक होत आहे. रोज लिलाव होत असून, दर्जेदार केळीला चांगले दर मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT