Agriculture Drone  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Drone : ड्रोनद्वारे पीक विशिष्ठ किटकनाशक फवारणीसाठी कृषी मंत्रालयाकडून एसओपी जारी

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते गुरूवारी (ता. २०) या एसओपीचे प्रकाशन करण्यात आले.

Team Agrowon

Agriculture Drone :केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून ड्रोनद्वारे (Kisan Drone) पीक विशिष्ट किटकनाशक फवारणीसाठीची (Crop Specific Pesticide Spraying) मार्गदर्शक तत्वे (एसओपी) जारी करण्यात आली आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांच्या हस्ते गुरूवारी (ता. २०) या एसओपीचे प्रकाशन करण्यात आले. (Sop's For Crop Specific Pesticide Drone Spraying)

यावेळी तोमर म्हणाले की, आमचे शेतीला प्राधान्य असल्यामुळे कृषी संशोधन असो की योजना सुरू करणे, शेतीला चालना देवून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याला सरकारने प्राधान्य दिले आहे. यावेळी मशिनरी फॉर मिलेट प्रॉडक्शन, प्रोसेसिंग अँण्ड व्हॅल्यू अॅडिशन या पुस्तिकेचेही प्रकाशन तोमर यांनी केले.

आज देशाने नॅनो युरिया, नॅनो डीएपी तयार केला आहे. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा स्विकारही केला आहे. मागे शेतीवर टोळधाडीचे संकट आले होते. त्यावेळी शेतीमध्ये ड्रोनच्या वापराची गरज भासू लागली होती.

तेव्हापासूनच केंद्र सरकारने शेतीमध्ये ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करणे आणि किटकनाशकांच्या दुष्परिणामांपासून मानवी शरिराचा बचाव करण्यासाठी किसान ड्रोन अंत्यत प्रभावी असल्याचेही तोमर यावेळी म्हणाले.

गावोगावी ड्रोन पोहोचवण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. आयसीएआर, केव्हिके. कृषी विद्यापीठे यांना ड्रोन खर्चाच्या १०० टक्के आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. प्रत्येक ड्रोनसाठी १० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतात प्रात्यक्षिकांसाठी एफपीओंना ड्रोनच्या खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकार शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत अडिच लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सुक्ष्म सिंचन योजनेचेही चांगले परिणाम दिसत आहेत. नैसर्गिक शेतीसारखे विषय पुढे नेले जात आहेत.

तोमर म्हणाले की, सरकार कोणतेही नवीन काम करते तेव्हा मदत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे, हे लक्षात ठेवले पाहिजे. यामुळेच जेव्हा ड्रोनची योजना तयार केली जात होती, तेव्हा सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य पदवीधरांनाही त्यात जोडण्यात आले होते, जेणेकरून ड्रोनचा वापर छोट्या शेतकऱ्यांना करता यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT