Cold Weather Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : आठवडाभर थंड, कोरडे हवामान

या आठवड्यात कमाल व किमान तापमानात वाढ होईल. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात थंडीचे प्रमाण सर्वसाधारण राहील. थंडीत फार मोठी वाढ अपेक्षित नाही. आकाश निरभ्र राहील.

 डॉ. रामचंद्र साबळे 

आज (ता. १५) महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब (Air Pressure) राहील. उद्या (ता. १६) हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके कमी राहतील.

त्यामुळे कमाल व किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ (Temperature Rise) होऊन थंडीची तीव्रता कमी (The cold Will Decrease) होईल. तशीच स्थिती मंगळवारी (ता. १७) राहील. बुधवारी (ता. १८) महाराष्ट्रासह दक्षिण भारतावर हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके वाढतील.

त्यामुळे थंडीचे प्रमाणही वाढेल. थंडीत झालेली वाढ गुरुवारपासून शनिवारपर्यंत (ता. १९ ते २१) कायम राहील. त्यामुळे हा आठवडा थंड आणि कोरड्या हवामानाचा (Dry Weather) राहील.

या आठवड्यात कमाल व किमान तापमानात वाढ होईल. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात थंडीचे प्रमाण सर्वसाधारण राहील. थंडीत फार मोठी वाढ अपेक्षित नाही. आकाश निरभ्र राहील.

सकाळच्या आणि दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल आणि थंड व कोरडे हवामान राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. काही जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे त्या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी होईल.

मात्र बऱ्याच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे काही दिवशी थंडी जाणवेल. रब्बी हंगामातील पिकांना व उन्हाळी हंगामात पेरणी करण्यासाठी हवामान अनुकूल राहील.

कोकण

कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, रत्नागिरी जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, ठाणे व रायगड जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अत्यल्प ढगाळ, तर उर्वरित जिल्ह्यात निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ५६ ते ६३ टक्के, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४७ ते ४८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते २८ टक्के राहील.

वाऱ्याची दिशा ठाणे व पालघर जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३६ टक्के इतकी कमी, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ४० ते ४२ टक्के इतकी राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात २२ टक्के, तर नाशिक, धुळे १७ ते १९ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

मराठवाडा

कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ११ ते १२ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, तर हिंगोली व लातूर जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४५ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता हिंगोली जिल्ह्यात १७ टक्के, बीड व परभणी जिल्ह्यांत १८ ते १९ टक्के, तर उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत २० ते २२ टक्के इतकी कमी राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ

बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमान तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २५ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ किमी राहील.

बुलडाणा जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर उर्वरित अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ

कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस व नागपूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५४ टक्के, तर दुपारची २२ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ

कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, गोंदिया जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस आणि भंडारा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील. दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत किमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, सोलापूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस आणि नगर व पुणे जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ५३ टक्के, तर सांगली, सातारा, पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत १९ ते २१ टक्के इतकी कमी राहील. दुपारी अत्यंत कोरडे हवामान राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील.

सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर कोल्हापूर व नगर जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

कृषी सल्ला

भेंडी, गवार, दोडका या भाजीपाला पिकांची लागवड करावी. उन्हाळी भात लागवडीसाठी गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. कलिंगड पिकामध्ये फळमाशी नियंत्रणासाठी सापळे लावावेत.

जनावरांच्या आहारात प्रथिने, खनिजयुक्त पदार्थांचा वापर वाढवावा. कुक्कुटपालन शेडमध्ये बल्ब लावून उष्णता निर्माण करावी.

(लेखक - ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT