Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

राज्याच्या किमान तापमानात होत असलेल्या वाढीमुळे गारठा कमी होत आहे. तर कमाल तापमानाचा पारा देखील सातत्याने चढता आहे.

Team Agrowon

पुणे : राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temprature) होत असलेल्या वाढीमुळे गारठा कमी होत आहे. तर कमाल तापमानाचा पारा देखील सातत्याने चढता आहे.

आज (ता. ९) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. बुधवारी (ता. ८) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जळगाव येथे तापमानाचा पारा १०.५ अंशांवर होता. तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान ११ ते १९ अंशांच्या दरम्यान आहे. पुढील काही दिवस किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.  

दिवसभर असलेल्या निरभ्र आकाशामुळे राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढू लागला आहे. दिवसा आणि रात्रीही उकाडा जाणवत आहे.

तापमानातील तफावत वाढल्याने पहाटे गारठा तर दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला येत आहे. कमाल आणि किमान तापमानात १४ ते २५ अंशांपर्यंत तफावत दिसून येत आहे.

बुधवारी (ता. ८) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती, वर्धा येथे कमाल तापमान ३४ अंशांवर होते.

उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी-अधिक होत आहे. बुधवारी (ता. ८) राजस्थानच्या चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता.९) जम्मू काश्मीर परिसरात हिमवृष्टी होण्याची शक्यता असून, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

बुधवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :


पुणे ३३.१ (१२.४), जळगाव ३३.५ (१०.५), धुळे ३१.०(११.०), कोल्हापूर ३३.३(१९.१), महाबळेश्वर २९.३ (१५.८), नाशिक ३२.३ (१२.०), निफाड ३१.८ (७.५), सांगली ३३.५ (१७.४), सातारा ३३.६ (१४.९), सोलापूर ३५.३ (१८.१), सांताक्रूझ ३२.५ (१८.८), डहाणू २९.८ (१७.६), रत्नागिरी

३१.०(१८.५), औरंगाबाद ३२.२ (११.०), नांदेड ३३.४ (१६.२), परभणी ३३.३(१४.६), अकोला ३४.४ (१४.१), अमरावती ३४.०(१२.७), बुलडाणा ३१.०(१५.४), ब्रह्मपुरी ३३.९ (१६.८), चंद्रपूर

३२.२(१७.४), गडचिरोली ३१.६(१२.०), गोंदिया ३२.५ (१३.५), नागपूर ३३.२ (१४.२), वर्धा ३४.०(१५.४), वाशीम ३३.४ (१६.४), यवतमाळ ३३.५ (१४.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

July Rainfall: जुलै महिन्यातही पाऊस कमीच

Shaktipeeth Highway Alignment: शेतकऱ्यांचा विरोध, शक्तिपीठ महामार्गाच्या ८ जिल्ह्यांतील आखणीत बदल, सरकारचा दावा

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस

Soybean Sowing: यंदा सोयाबीन क्षेत्र वाढण्याचा अंदाज; जळगावची आघाडी

Kharif Sowing Update: खानदेशात ६० टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण

SCROLL FOR NEXT