Weather Udpate Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : किमान तापमान वाढण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या किमान तापमानात चढ- उतार होत आहेत. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम असला, तरी उर्वरित राज्यात थंडी काहीशी कमी झाली आहे.

Team Agrowon

पुणे : महाराष्ट्राच्या किमान तापमानात (Minimum Temperature) चढ- उतार होत आहेत. उत्तर महाराष्ट्रात गारठा (Cold Weather) कायम असला, तरी उर्वरित राज्यात थंडी (Cold) काहीशी कमी झाली आहे. आज (ता. १८) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम राहणार असून, किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथील कृषी महाविद्यालय मंगळवारी (ता. १७) राज्यातील नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथे ७.६ अंश, तर नाशिक येथे ९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्याच्या उर्वरित भागात तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेला. कमाल तापमानातही वाढ होत असून, तापमानाचा पारा २६ ते ३६ अंशांच्या आसपास आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

हिमालय पर्वत आणि लगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे. मंगळवारी (ता. १७) राजस्थानच्या चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी उणे २.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १८) पंजाब, हरियाना, चंडीगड, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश राज्यांच्या काही भागांत थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यात दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३२ (१०.२), जळगाव - (१०.३), धुळे २७ (६.५), कोल्हापूर ३२.४ (१६.९), महाबळेश्‍वर २६.८(१३.५), नाशिक ३० (९.६), निफाड ३०.२ (७.६), सांगली ३१.७ (१५.३),

सातारा ३२.५ (११.९), सोलापूर ३५.२ (११.९), सांताक्रूझ २७.६ (१५.२), डहाणू - (१४.१), रत्नागिरी २९.५ (१६.६), औरंगाबाद २९.८ (११), नांदेड - (१६.८), परभणी ३२(१५.२), अकोला ३१.४ (१७.१), अमरावती ३० (१५.३),

बुलडाणा २९.६ (१४.८), ब्रह्मपुरी ३०.८ (१६), चंद्रपूर २९ (१४), गडचिरोली २९ (१४.०), गोंदिया २७.२ (१३.२), नागपूर २८.२ (१३.२), वर्धा २९.५ (१५.१), वाशीम ३२ (१४.६), यवतमाळ ३०.५ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT