Weather Update  Agrowon
ताज्या बातम्या

Weather News : किमान तापमानात घट होण्याची शक्यता

Weather Update : बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वादळी प्रणालींमुळे राज्यात झालेले पावसाळी वातावरण निवळल्यानंतर राज्यात निरभ्र आकाश होत आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वादळी (Cyclone) प्रणालींमुळे राज्यात झालेले पावसाळी वातावरण (Rainy Climate) निवळल्यानंतर राज्यात निरभ्र आकाश होत आहे. उन्हाचा चटका (Heat) आणि वाढलेला उकाडा कायम असून, आजपासून (ता. १९) किमान तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या तापमानाचा वाढ झाली असतानाच, उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्येही थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हरियाना, चंडीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील चुरू येथे रविवारी (ता. १८) देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पूर्व विदर्भात किमान तापमानाचा पारा घसरला आहे. आजपासून (ता. १९) विदर्भासह अंतर्गत मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. १८) नागपूर येथे राज्यातील नीचांकी १२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात किमान तापमान १४ ते २४ अंशांच्या दरम्यान होते. सांताक्रूझ देशातील उच्चांकी ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र होतेय तीव्र

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन)किनाऱ्यापासून दूर निघून गेली असून, ही प्रणाली ओसरली आहे. दरम्यान, आग्नेय बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ कमी दाब क्षेत्र वायव्येकडे सरकत असून, या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.७ (१७.२), जळगाव ३३.२ (१७), धुळे ३२ (१४.५), कोल्हापूर ३१.७ (२०.९), महाबळेश्‍वर २६.२(१६.२), नाशिक ३०.८ (१७.६), निफाड ३१.६ (१७.५), सांगली ३१.८ (१९.५), सातारा ३०.५ (१८.६), सोलापूर ३४.२ (२०.५), सांताक्रूझ ३५.९ (२३.६), डहाणू ३१.१ (२२.७), रत्नागिरी ३५.४ (२२.८), औरंगाबाद ३२.४ (१४.२), नांदेड ३१.२ (१९), परभणी ३२ (१८), अकोला ३३.६ (१८.७), अमरावती ३३.८ (१६.१), बुलडाणा ३०.२ (१६.२), ब्रह्मपुरी ३२.७ (१३.९), चंद्रपूर ३०.२ (१५.४), गडचिरोली ३१ (१३.२), गोंदिया ३०.८ (१४.८), नागपूर ३१ (१२.२), वर्धा ३१.९ (१४), यवतमाळ ३१ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT