Weather Udpate Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्याच्या किमान तापमानात वाढ

उत्तर महाराष्ट्रात थंडी टिकून असली तरी उर्वरित राज्यात मात्र गारठा कमी झाला आहे. आज (ता. २१) उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानातील घट कायम राहणार आहे.

Team Agrowon

पुणे : उत्तर महाराष्ट्रात थंडी (Cold) टिकून असली तरी उर्वरित राज्यात मात्र गारठा (Cold Weather) कमी झाला आहे. आज (ता. २१) उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानातील (Minimum Temperature) घट कायम राहणार आहे.

तर विदर्भ, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे शुक्रवारी (ता. २०) राज्यातील निचांकी ९.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

राज्याच्या उर्वरित भागात बहुतांशी ठिकाणी तापमान १४ अंशांच्या वर गेल्याने गारठा कमी झाला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी धुके पडल्याचे दिसून आले. उन्हाचा चटका वाढल्याने राज्याच्या कमाल तापमानातही वाढ होत झाली आहे.

बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० ते ३५ अंशांच्या आसपास आहे. यवतमाळ येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

हिमालय पर्वत व लगतच्या भागात होत असलेली हिमवृष्टी सुरूच असली तरी उत्तर भारतातील राज्यात थंडी कमी झाली आहे.

शुक्रवारी (ता. २०) उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २१) ओडिशा, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांच्या काही भागात दाट धुके पडण्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.१ (१२.०), जळगाव ३०.५ (१५.८), धुळे ३०.० (११.६), कोल्हापूर ३०.८ (१७.३), महाबळेश्वर २८.१(१४.१), नाशिक ३१.८ (११.०), निफाड ३०.६ (९.१), सांगली ३१.५ (१६.८), सातारा ३१.७ (१३.०), सोलापूर ३३.७ (१८.२),

सांताक्रूझ २९.८ (१७.२), डहाणू २८.४ (१४.६), रत्नागिरी ३२.२(१७.७), औरंगाबाद ३१.४ (११.६), नांदेड ३१.८ (१६.२), परभणी ३१.१(१७.७), अकोला ३३.३ (१६.४), अमरावती ३०.४ (१५.१), बुलढाणा ३०.५ (१७.०), ब्रह्मपूरी ३१.३ (१६.९),

चंद्रपूर २९.८ (१७.७), गडचिरोली ३१.२(१५.२), गोंदिया २९.२(१४.२), नागपूर ३०.० (१५.५), वर्धा ३१.२(१६.४), वाशीम ३२.२ (१५.४), यवतमाळ ३४.० (१९.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT