Millets In Diet Agrowon
ताज्या बातम्या

Millet Year 2023 : पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त सोलापुरात आज मिलेट दौड

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत कृषी विभाग व इतर विभागांच्या सहकार्याने शुक्रवारी (ता. १७) सोलापुरात मिलेट दौडचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर ः आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ (Millet Year 2023) अंतर्गत कृषी विभाग व इतर विभागांच्या सहकार्याने शुक्रवारी (ता. १७) सोलापुरात मिलेट दौडचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे (Balasaheb Shinde) यांनी दिली.

सोलापुरातील छत्रपती शिवाजी चौकातून सकाळी आठ वाजता ही दौड सुरू होणार असून, सरस्वती चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, डफरीन चौक, हरिभाई देवकरण प्रशाला मार्गे होम मैदान येथे समारोप होणार आहे.

या कार्यक्रमास सुमारे ५०० ते ८०० विद्यार्थी व नागरिक उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. मुख्यतः तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा प्रमुख हेतू आहे.

यानिमित्त या वर्षी देश ते गावपातळीपर्यंतच्या सर्व स्तरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या उपक्रमाचा भाग म्हणून हा उपक्रम आयोजिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

फेब्रुवारी महिना ज्वारीचा
पौष्टिक तृणधान्य वर्ष या संकल्पनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोडो, कुटकी, सावा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांचे आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्यांचे प्रमाण वाढविणे हा यामागील उद्देश आहे.

याच उपक्रमाचा भाग म्हणून ‘मिलेट ऑफ दि मंथ’ या संकल्पनेअंतर्गत फेब्रुवारी महिना ज्वारी या पिकाकरीता समर्पित असून, या अनुषंगाने ज्वारी पिकाचे आहारातील महत्त्व सांगणारे पत्रकांचे वितरण या वेळी करण्यात येणार आहे, असेही शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT