Milk production Agrowon
ताज्या बातम्या

Milk Production : विदर्भातील दूध उत्पादन तीस लाख लिटरवर नेणार

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या दूध संघामार्फत तीन लाख लिटरचे संकलन होते. दुसरीकडे विदर्भ-मराठवाड्यातील अकरा जिल्ह्यांत दूध संकलन तीन लाख लिटर आहे.

टीम ॲग्रोवन

नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (PDKV) कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या दूध संघामार्फत तीन लाख लिटरचे संकलन (Milk Collection) होते. दुसरीकडे विदर्भ-मराठवाड्यातील अकरा जिल्ह्यांत दूध संकलन तीन लाख लिटर आहे. ही लाजिरवाणी बाब असून येत्या काळात ११ जिल्ह्यांतील संकलन ३० लाख लिटरवर पोहोचलेच पाहिजे, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली.

‘विदर्भ-मराठवाड्यातील दूध उत्पादन’ या विषयावर ॲग्रोव्हिजनमध्ये आयोजित कार्यशाळेत ते रविवारी (ता. २७) बोलत होते. विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचे समन्वयक रवींद्र ठाकरे, कुलगुरू डॉ. शरद गडाख, मदर डेअरीचे प्रकल्प संचालक श्रीधर, डॉ. आर. एन. काटकर, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आशिष पातुरकर या वेळी उपस्थित होते.

गडकरी पुढे म्हणाले, विदर्भ मराठवाड्यात दुग्ध उत्पादनाला चालना मिळावी याकरिता मदर डेअरीचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची धुरा रवींद्र ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांच्या प्रयत्नामुळे अकरा जिल्ह्यांत दूध संकलन तीन लाख लिटरवर पोहोचले आहे.

येत्या काळात ते ३० लाख लिटरवर पोहोचेल याकरिता सामूहिक प्रयत्न झाले पाहिजे. सध्या नागपुरात ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाची प्रयोगशाळा आहे. अशा प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्यात असाव्या याकरिता राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT