Sugarcane Cutting Labourer Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Cutting labourer : ऊस तोडणीसाठी मजुरांसोबत विद्यार्थ्यांचेही स्थलांतर

जिल्ह्यात मोठा उद्योग नसल्याने सुशिक्षित तरुणांसह मजुरांना नियमित रोजगार नाही. परिणामी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर हाच एकमेव पर्याय आहे.

Team Agrowon

यवतमाळ : ‘‘जिल्ह्यात मोठा उद्योग नसल्याने सुशिक्षित तरुणांसह मजुरांना (Sugarcane Cutting Labourer) नियमित रोजगार नाही. परिणामी पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर (Migration) हाच एकमेव पर्याय आहे. महागाव, उमरखेड, पुसद, दिग्रस या तालुक्यांत येणाऱ्या दुर्गम भागांतील मजुरांना दरवर्षीच ऊसतोडणीसाठी पश्‍चिम महाराष्ट्र, कनार्टक आदी ठिकाणी स्थलांतर करावे लागते.

यंदाही ऊस तोडणीसाठी पालकांसह मुलांनीही स्थलांतर केले आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. हंगामी वसतिगृह सुरू करण्यासाठी दरवर्षी प्रस्तावांचा पाऊस पडतो. यंदा मात्र, अनास्थाच आहे.

पुसद, महागाव, उमरखेड, दिग्रस या तालुक्यांतील हजारो मजूर ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाले आहेत. हंगामी वसतिगृह सुरू न झाल्याने मुलेही आईवडिलांसोबत गेली आहेत आणि जात आहेत. गावांत मजूरच राहत नसल्याने अनेक गावे ओस पडायला लागली आहेत. टीचभर पोटासाठी सहा महिने गावापासून दूर राहावे लागत असल्याने मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली जात आहेत. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरा होत असताना ऊसतोड मजुरांना सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

घरापासून हजारो किलोमीटर शेतात पाल ठोकून वास्तव्य करणाऱ्या मजुरांच्या वाटेला अंधकारमय यातनाच येत आहेत. त्यांना शौचालय, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, वाहतूक या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी यावर्षी शिक्षण विभागाने हंगामी वसतिगृहासाठी प्रस्ताव मागितले. आतापर्यंत उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील एकच प्रस्ताव आला आहे. इतर तालुक्यांत हंगामी वसतिगृहासाठी पाठच दाखविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

हंगामी वसतिगृहासाठी उमरखेड तालुक्यातील नागापूर येथील एकच प्रस्ताव आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना हमीकार्ड दिले जाते. मुले ज्या ठिकाणी स्थलांतरित होतात. त्या परिसरातील शाळेत त्यांना प्रवेश दिला जातो. परत आल्यावर पुन्हा जुन्या शाळेतही परीक्षा देता येते.

- प्रमोद सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT