Dr. Indra Mani Agrowon
ताज्या बातम्या

Dr. Indra Mani : ‘एमजीएम’स्थित महाविद्यालयांनी अधिस्वीकृतीसाठी प्रयत्न करावेत

गुणवत्ता व संशोधन वाढीस चालना मिळण्यासाठी ‘एमजीएम’स्थित महाविद्यालयांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेची अधिस्वीकृती मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद ः ‘‘गुणवत्ता व संशोधन वाढीस चालना (Research And Quality) मिळण्यासाठी ‘एमजीएम’स्थित महाविद्यालयांनी (MGM Based College) भारतीय कृषी संशोधन परिषदेची (ICAR) अधिस्वीकृती मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत,’’ असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांनी केले.

येथील गांधेली परिसरातील एमजीएम हिल्स कृषी परिसराची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी मंगळवारी (ता. ३) पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते.

महात्मा गांधी मिशन नेहमीच आपल्या वेगळ्या कार्याने कायम नावलौकिक मिळवत आहे. त्याचाच परिपाक म्हणून गांधेली परिसरात अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये डोंगरावर फुललेल्या एमजीएम हिल्स गांधेली परिसरातील कृषी व संलग्न शाखा वेगवेगळ्या गुणवत्तेमुळे चर्चेत असतात.

त्याअनुषंगाने डॉ. मणी यांनी येथील सर्व उपक्रमांना भेट देत तांत्रिक बाबींचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. डी. एन. गोखले व बदनापूर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. डी. अहिरे उपस्थित होते.

शासनमान्य रोपवाटिका, द्राक्ष बाग, दुग्धप्रक्रिया व अन्नप्रक्रिया उद्योग, रेशीमधागा निर्मिती केंद्र, जैविक उत्पादने निर्मिती केंद्र, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा व स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी अंतर्गत सुरू उपक्रमांना डॉ. मणी यांनी भेट दिली.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलेश मस्के, एमजीएम हिल्स कृषी परिसराचे संचालक डॉ. सुदाम पवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. काकासाहेब सुकासे, प्राचार्य डॉ. नरेंद्रसिंग चव्हाण, प्राचार्य डॉ. सोनल झंवर व केव्हीकेचे शास्त्रज्ञ आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT