Training Program Agrowon
ताज्या बातम्या

Training Program : विवरा येथे औषधी, सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण

वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. बालकिशोर मुराडी यांनी औषधी वनस्पतींचे मूल्यवर्धन कसे करावे याबाबत माहिती दिली.

Team Agrowon

केंद्र शासनाच्या (Central Government) भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University) अखिल भारतीय समन्वयित औषधी व सुगंधी वनस्पती आणि पानवेली संशोधन प्रकल्पाद्वारे प्रमोद इंगळे यांच्या शेतावर अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी औषधी व सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले.

या वेळी अनुसूचित जाती प्रवर्गातील २५ शेतकऱ्यांना १० प्रकारच्या औषधी वनस्पती, कृषी संवादिनी, कृषी दिनदर्शिका, पीडीकेव्ही मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड-२, टोपले, वनौषधी चूर्ण, कवचबीज बियाणे तसेच सुगंधी तेलाची निविष्ठा वाटप करण्यात आली.

प्रशिक्षणामध्ये संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली सफेद मुसळी व सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान विषयावर नागार्जुन वनौषधी उद्यानचे प्रमुख डॉ. नितीन पतके यांनी, तर विविध औषधी वनस्पतींचे गुणधर्म या विषयावर जैवतंत्रज्ञान सहायक प्रा. डॉ. अमित देशमुख मार्गदर्शन केले.

कृषी वनस्पतिशास्त्र सहायक प्रा. डॉ. मनीष वाकोडे यांनी औषधी वनस्पतींचे संकलन करून संवर्धन कसे करावे याची शेतकऱ्यांना माहिती दिली.

वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. बालकिशोर मुराडी यांनी औषधी वनस्पतींचे मूल्यवर्धन कसे करावे याबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमात प्रगतिशील महिला शेतकरी श्रीमती आशा शिवदास क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT