Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : बळीराजावरचं संकट दूर होवो

आदेश देऊन घरी बसणारा मुख्यमंत्री मी नाही. काही लोकं म्हणतात, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पण मी अयोध्येत आहे, असे असले तरी मी सचिव, जिल्ह्याधिकारी यांच्यासोबत संपर्कात आहे.

Team Agrowon

Agriculture News अयोध्या, उत्तर प्रदेश : आदेश देऊन घरी बसणारा मुख्यमंत्री मी नाही. काही लोकं म्हणतात, शेतकऱ्यांचे नुकसान (Crop Damage) होत आहे. पण मी अयोध्येत आहे, असे असले तरी मी सचिव, जिल्ह्याधिकारी यांच्यासोबत संपर्कात आहे.

नुकसानग्रस्त भागात जाऊन भेट द्या. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तिथं जा, अशा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहे. आदेश देऊन घरी बसणारा मी मुख्यमंत्री नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

बळीराजावरचं संकट-अरिष्ट दूर होवो, महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे-समाधानाचे दिवस येवोत, हीच प्रार्थना आम्ही श्रीरामासमोर केली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हे अयोध्या दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी (ता. ९) राम जन्मभूमी स्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या वेळी शिंदे म्हणाले, की अयोध्येतील राममंदिर पूर्ण होत असल्याने लाखो लोकांना आनंद देणारी बाब आहे. पण, काही लोकांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. हिंदू धर्माविषयी चुकीची माहिती दिली जाते. हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. सर्वांना घेऊन जाणारा असा हा धर्म आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

२०१४ मध्ये हिंदुत्वाच्या विचाराचे सरकार आले. त्यावेळी आम्हाला मान-सन्मान मिळाला. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे विचार एक आहेत.

अयोध्येत मंदिर झाले पाहिजे अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या विचारांच्या विरुद्ध जाऊन सरकारच्या आमिषाने काँग्रेस सोबत सत्तेत गेले, अशी टीका शिंदे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT