Yavtmal APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

Yavtmal APMC Election: यवतमाळ जिल्ह्यात ३० एप्रिलपूर्वी बाजार समित्यांच्या निवडणुका

यवतमाळ जिल्ह्यात १७ बाजार समित्या आहेत. या समित्यांवर अशासकीय सदस्य प्रशासक म्हणून कामकाज सांभाळत होते. अशात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते.

Team Agrowon

यवतमाळ : बाजार समित्यांची निवडणूक (APMC Election) ३० एप्रिलपूर्वी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिले आहे. त्यामुळे आता निवडणुकांच्या कार्यक्रमाकडे सहकार क्षेत्रातील दिग्गजांचे लक्ष लागले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात १७ बाजार समित्या (भोनोूसोत APMC Election) आहेत. या समित्यांवर अशासकीय सदस्य प्रशासक म्हणून कामकाज सांभाळत होते. अशात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्याची तयारी सुरू झाली होती.

काहींनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला तर शासनानेही अध्यादेश निर्गमीत केले. या संपूर्ण प्रकरणाची एकत्रित सुनावणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात सुरू होती.

या सुनावणीत बाजार समितीतील अशासकीय सदस्यांऐवजी शासकीय सदस्यांची नेमणूक करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक किंवा सहाय्यक उपनिबंधकांकडे बाजार समित्यांचा कारभार सोपविण्यात येणार आहे.

तर निवडणुका ३० एप्रिलपूर्वी घेण्याबाबत आदेशात नमूद आहे. त्यामुळे आता सहकार निवडणूक प्राधीकरण कधी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार, याकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात उमरखेड, पांढरकवडा या दोन बाजार समित्या वगळता उर्वरित १५ ठिकाणच्या निवडणुका लवकरच लागण्याचे संकेत आहेत. बाजार समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर जिल्हा उपनिबंधकांनी सहकारी संस्थांना सदस्यसूची मागितली होती.

या कार्यक्रमाला २९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली होती. न्यायालयात प्रकरण गेल्याने सर्व प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT