APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : सातारा जिल्ह्यात बाजार समित्यांचे बिगुल एप्रिलमध्येच

न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार याची उत्सुकता लागली होती.

Team Agrowon

सातारा : न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Satara APMC) निवडणुका होणार याची उत्सुकता लागली होती. पण जिल्ह्यातील तब्बल ६० विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुका (APMC Election) प्रलंबित असून, त्यांच्या निवडणुका १८ मार्चपर्यंत संपवून त्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू होणार आहे.

नवीन ग्रामपंचायत सदस्यांचा मतदानाचा मुद्दा निकाली निघाल्यानंतर ३० एप्रिलपर्यंत बाजार समित्यांच्या निवडणुका संपवाव्यात, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे नव्या सदस्यांना समावून घेऊन मतदार यादी झाली, की बाजार समितींचा निवडणूक कार्यक्रम लागणार असल्याचे चित्र होते. मात्र जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. त्यामुळे अशा प्रलंबित ५२ विकास सेवा सोसायट्यांची निवडणूक १८ मार्चपर्यंत संपविण्याची सूचना सहकार निवडणूक प्राधिकरणाने केल्या आहेत.

त्यामुळे सहकार विभागाने ५२ सोसायट्यांचा कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील सात, कोरेगाव आठ, फलटण आठ, पाटण सात, खटाव सात, वाई एक, माण तीन आणि कऱ्हाड ११ अशा ५२ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये कऱ्हाड, कोरेगाव, फलटण तालुक्यांतील सर्वाधिक विकास सेवा सोसायट्यांचा समावेश आहे. १८ मार्चपर्यंत या निवडणुका पूर्ण करून त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींचा निवडणूक कार्यक्रम लागणार आहे.

त्यासाठी प्रथम बाजार समितींत नव्याने मतदान करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यांचा मतदार यादीत समावेश करून यादी अद्ययावत केली जाईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम सुरू होईल.

जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, पाटण, जावली, कोरेगाव, फलटण, वाई, वडूज, लोणंद या नऊ बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहे. बाजार समितीची सत्ता आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, दोन्ही शिवसेनेचे नेते सध्या सक्रिय झाले आहेत.

...असे असेल संचालक मंडळ

बाजार समितीसाठी सोसायटी गटातून ११ सदस्य निवडले जातात. त्यामध्ये खुल्या गटातील उमेदवारांसह दोन महिलांचा समावेश असतो. ग्रामपंचायतीतून चार सदस्य निवडले जातात.

त्यात ग्रामपंचायतीतून अनुसूचित जमातीमधील एक, एक आर्थिक दुर्बल आणि अन्य दोन सदस्य निवडले जातात. त्याचबरोबर आडत व्यापारी गटातून दोन, तर हमाल मापाडी गटातून एक सदस्य असे १८ सदस्य निवडले जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT