Maratha reservation Protest
ताज्या बातम्या

Talathi Exam : तलाठी परीक्षेवर बंदचं सावट, ST च्या फेरी रद्द झाल्याने उमेदवारांची कसरत

Talathi Bharti Exam : मराठा आरक्षणाच्या मागणासाठी आज राज्यात विविध संघटनांनी बंद पुकारला. दरम्यान, तलाठी भरतीची परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागत आहे.

Swapnil Shinde

Maratha reservation row Updates: मराठा आरक्षणासाठी जालन्यात आंदोलन सुरू आहे. यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर त्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील विविध संघटनांनी आज (ता. ४ ) बंद पुकारला आहे. एसटी महामंडळाने बस गाड्याच्या अनेक फेऱ्या रद्द केल्यात. त्यात आज तलाठी भरतीची परीक्षा असल्याने उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

जालनातील लाठीचार्जाच्या निषेधार्थ आज विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. संभाजीनगर, सोलापूर, साताऱ्यासह अनेक शहरांमध्ये बंद पुकारण्यात येत आहेत. तसेच ठिकठिकाणी रास्तारोका करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून एसटी बसवर दगडफेक आणि आग लावण्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एसटी महामंडळाने लांब पल्ल्यांच्या बस गाड्या रद्द केल्या आहेत.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल (रविवारी) एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केली होती.

राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू असून त्याचा तिसरा टप्पा सोमवारी पार पडणार आहे. परंतु मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम परीक्षेवर दिसून येत आहे. सध्या अनेक ठिकाणी रास्तारोका करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना वेळेत परिक्षा केंद्रावर पोहोचणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाने जर अशा मुलांची संधी हुकली तर त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT