Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : पीककर्जासाठी हवा नकाशा अन् फेरफारही

पूर्वी तीन ते चार कागदपत्रे जोडली की पीककर्ज मिळत होते. यंदाच्या हंगामापासून मात्र दहा प्रकारच्या कागदपत्रांची मागणी होत आहे.

Team Agrowon

Yavatmal News : पूर्वी तीन ते चार कागदपत्रे जोडली की पीककर्ज (Crop Loan) मिळत होते. यंदाच्या हंगामापासून मात्र दहा प्रकारच्या कागदपत्रांची मागणी होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वेठीस धरण्याचा हा प्रकार असून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राळेगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पूर्वी पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सातबारा, ‘आठ-अ’, प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड एवढेच दस्तऐवज लागत होते. आता फेरफार, शेतीचा नकाशासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे.

या संदर्भात सेवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी यंदाच्या पीककर्जासाठी नव्याने अधिकच्या दस्तऐवजांची मागणी जिल्हा बॅंकेच्या स्तरावरून करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

थकीत कर्ज वसुलीसाठी अडचणी येतात. शिवाय निबंधकांकडे वसुली प्रमाणपत्र मिळणे कठीण जाते, यामुळे बॅंकेने ही कागदपत्रे मागितल्याची माहिती बॅंक सूत्रांनी दिली.

नव्याने मागणी होणारी कागदपत्रे अशी...

- वचनचिठ्ठी, फेरफार, शेतीचा नकाशा, वारसाची माहिती, केसीसी पासबुक

काही कागदपत्रांची अट शिथिल करा

पीककर्जासाठी शेतीचा नकाशा, फेरफारसह काही क्‍लिष्ट कागदपत्रांची अट शिथिल करावी, अशी मागणी विविध सेवा सोसायटी अध्यक्ष व संचालकांनी राळेगाव तहसीलदारांना निवेदनाव्दारे केली आहे. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे, उपाध्यक्ष राजेश काळे, संचालक कृष्णाजी राऊलकर, जानराव गिरी, तातेश्‍वर पिसे, गजानन पाल गजानन महाजन, विनायक नगराळे, प्रकाश मोहता, गोवर्धन वाघमारे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT