Manoj Jarange Agrowon
ताज्या बातम्या

Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आमरण उपोषण मागे, पण आंदोलन कायम

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले. पण त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी आजपासून आमरण उपोषण मागे घेतले. परंतु आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची त्यांनी भूमिका स्पष्ट केले.

Swapnil Shinde

Maratha Reservation News : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांनी आज उपोषण मागे घेण्यात आले. परंतु जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करणार नाहीत, त्यापर्यंत महिनाभर मनोज जरांगे पाटील आंदोलनस्थळीवर बसून राहणार आहेत. दरम्यान, सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या संपर्कात आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावे या आग्रही मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 16 वा दिवस आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य शासन एक महिन्यांची मुदत मागितली आहे. त्यानंतर आजपासून जरांगे यांनी उपोषण स्थगित केले. परंतु पुढचा महिनाभर आंदोलनस्थळी असणार आहेत. ते साखळी उपोषण करणार आहेत.

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे ‘आपण बोलून मोकळं व्हायचं’ असं बोलताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यावर शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. ‘मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून आरक्षण देण्याबाबत प्राधान्याने काम करीत आहे.

शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

Sugarcane FRP: सोलापूर जिल्ह्यात थकली ६४२ कोटींची एफआरपी

Shekru Sighting: वाईत दुर्मिळ शेकरूचे दर्शन

Onion Seed Production: कांद्याच्या बीजोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Union Budget 2026: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT