Sugar Industry Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Industry : ‘माळेगाव’ उभारणार पाच कोटींचे साखर गोडाउन

माळेगावच्या प्रशासनाने आगामी ऊस गळीत हंगामात उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त साखरेचे संरक्षण होण्यासाठी साडेतीन लाख क्विंटल साठवण क्षमतेचे गोडाऊन उभारण्याचे निश्चित केले आहे.

टीम ॲग्रोवन

माळेगाव ः ‘‘माळेगावच्या (Malegaon Sugar Factory) प्रशासनाने आगामी ऊस गळीत हंगामात (Sugarcane Crushing Season) उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त साखरेचे (Sugar Production) संरक्षण होण्यासाठी साडेतीन लाख क्विंटल साठवण क्षमतेचे गोडाऊन (Sugar Storage Warehouse) उभारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सुमारे ५ कोटी रुपयांची तरतूद प्रशासनाने केली आहे. पुढील दोन ते अडीच महिन्यांत हे गोडाउन प्रत्यक्षात वापरात येईल,’’ अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.

गोडाउनच्या कामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष सागर जाधव आदी संचालक मंडळांच्या हस्ते नुकताच झाला. संचालक रंजन तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, अनिल तावरे, मदनराव देवकाते, संजय काटे, स्वप्नील जगताप, दत्तात्रेय येळे, तानाजी देवकाते, पोपटराव बुरुंगले, प्रताप आटोळे, माजी संचालक तानाजी पोंदकुले, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप, सिव्हिल इंजिनिअर अजित देवकाते आदी उपस्थित होते.

सतरा लाख क्विंटलपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन होत आहे. कारखान्याची मुळची साखर साठवण क्षमता साडेदहा लाख क्विंटलपर्यंत आहे. उर्वरित साखर कारखाना कार्यस्थळावर उघड्यावर ताडपत्रीद्वारे झाकून ठेवली जात होती. त्यामुळे संचालक मंडळाने नव्याने साखर गोडाउन उभारणीचा धोरणात्मक निर्णय घेतला. गोडाउनचा आकार ११७.४० बाय ४६ मीटर, क्षेत्रफळ ५८ हजार चौरस फूट, साखर पोती क्षमता ३.५० लक्ष क्विंटल आहे. तर सुमारे पाच कोटी रुपये खर्च होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khet Bachao Abhiyan: देशभरात २२ ऑक्टोबरपासून ‘शेत वाचवा' अभियानाला सुरुवात; केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, ओल्या भुईमुगाचे दर टिकून, फ्लॉवरच्या आवकेत बदल, मेथीच्या दरात चढ-उतार तर केळीचे दर स्थिर

Crop Damage Panchnama: दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांत पीक नुकसानीचे पंचनामे सुरू; केंद्राचे पथक लवकरच महाराष्ट्रात : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Drought Affected Farmers: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या

Urea Treatment: वाळलेल्या पिकांपासून घरच्या घरी बनवा जनावरांसाठी पौष्टिक चारा

SCROLL FOR NEXT