Turmeric Seed Agrowon
ताज्या बातम्या

Turmeric Seed Bank : हळदीचे क्षेत्र वाढीसाठी लोकसहभागातून बियाणे बँक बनवा

Turmeric Cultivation : कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी यांनी सध्या जिल्ह्यात २५० हेक्टर हळद लावगड क्षेत्र असून ते २ हजार हेक्टरवर नेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये मोठी मागणी असून जिल्ह्यात हळदीचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी लोकसहभागातून बियाणे बॅक बनवा, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हळद लागवड नियोजन बैठक झाली. या बैठकीला आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत उपस्थित होते.

कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी यांनी सध्या जिल्ह्यात २५० हेक्टर हळद लावगड क्षेत्र असून ते २ हजार हेक्टरवर नेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शिवाय फोंडाघाट येथे २ लाख २० हजार हळद रोपे तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

या वेळी पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, की शेतकऱ्यांना योग्य भावात बियाणे मिळायला हवे. चढ्या भावाने त्याची विक्री होणार नाही यासाठी त्यावर नियंत्रण ठेवा. ‘मागेल त्याला हळद रोपे’ असा उपक्रम सुरू करा.

त्यासाठी लोकसहभागातून बियाणे बँक बनवा. शिवाय मागील वर्षी उत्पादन झालेल्या हळदपूड खरेदीसाठी व्यवस्था करा. जिल्ह्यातील हळदीला विविध शहरांमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे कृषी विभागाने हळद लागवड क्षेत्र वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT