Mosmabi Orchard  Agrowon
ताज्या बातम्या

Mosambi Orchard : चांगल्या उत्पादनासाठी मोसंबी बागांचे आरोग्य जपा

मोसंबी बागेतून चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळविण्यासाठी झाडांचे आरोग्य जपणे अधिक फायदेशीर ठरते, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

Team Agrowon

Jalna News : मोसंबी बागेतून (Mosambi Orchard) चांगल्या प्रतीचे उत्पादन (Mosambi Production) मिळविण्यासाठी झाडांचे आरोग्य जपणे अधिक फायदेशीर ठरते, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

सहकार व पणन विभागाच्या ऍग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट) आणि आकाश ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीमार्फत तीर्थपुरी (ता. घनसांगवी) येथे आयोजित मोसंबी पीक उत्पादन, सुगीपश्‍चात हाताळणी, विपणन प्रक्रिया या प्रशिक्षणाच्या प्रसंगी शुक्रवारी (ता. १०) ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर पणन मंडळाचे विभागीय उपसंचालक जी. सी. वाघ, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. शशिकांत पाटील, मोसंबी बागायतदार संघाचे सचिव अतुल लड्डा, आकाश ऍग्रोचे संचालक आकाश गौर आदींची उपस्थिती होती.

या वेळी डॉ. पाटील म्हणाले, की मोसंबी पिकाचे अन्नद्रव्य-पाणी व्यवस्थापन नीटनेटके केल्यास झाडांची डायबॅक, गमोसीस, ग्रीनिंग, झाडे पिवळी पडणे आदी रोगास प्रतिकार करण्याची क्षमता वाढीस लागते, त्यामुळे फळांची प्रत अन् दर्जा सुधारून बाजारपेठेत अधिकचे दर मिळतात, म्हणून बागायतदारांनी झाडांचे आरोग्य जपण्यावर अधिकचा भर द्यावा.

मोसंबी उत्पादकांनी प्रक्रिया उद्योग उभारणीवर भर द्यावा, असे आवाहन डॉ. शशिकांत पाटील यांनी तर पणन मंडळाच्या मोसंबी प्रक्रिया उद्योग उभरणीसाठीच्या विविध योजनांची माहिती जी सी वाघ यांनी दिली.

मोसंबी बागांची सिट्रस नेटवर नोंदणी करण्याचे आवाहन अतुल लडडा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाश गौर यांनी तर आभार प्रदर्शन राजीव पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT